मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Drishyam 2 : 2 ऑक्टोबरला काय घडलं? उघडणार मोठं गुपित; 'दृश्यम 2' या दिवशी होणार रिलीज

Drishyam 2 : 2 ऑक्टोबरला काय घडलं? उघडणार मोठं गुपित; 'दृश्यम 2' या दिवशी होणार रिलीज

Drishyam 2

Drishyam 2

विजय साळगावकर त्यांच्या कुटुंबासह परतणार. 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 28 सप्टेंबर : अजय देवगण दमदार अभिनेता आहे. त्याच्या प्रत्येक भूमिका चाहत्यांना भावतात. पण त्याचा एक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. दरवर्षी  2 ऑक्टोबर ला या चित्रपटाची आठवण चाहते काढतातच. हा चित्रपट म्हणजे 'दृश्यम'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता  'दृश्यम 2' सुद्धा बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अजयनेच याबद्दल पोस्ट करत चाहत्यांना सांगितलं आहे. त्याने  त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना  'दृश्यम 2' साठी जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अजयने या सिनेमाचे पोस्टर रिलीज करत सिनेमाचा टीझर कधी येणार ते सांगितले आहे.

काल अजय देवगणने इंस्टाग्रामवर काही 'जुनी बिले' शेअर केली होती. या फोटोला त्याने 'काही जुनी बिलं सापडली आहेत' असं कॅप्शन दिल होतं.  ही  बिले 2014 सालचे होती.आता ज्यांनी 'दृश्यम' चित्रपट पहिला असेल त्यांना हे बिलांचं  प्रकरण चांगलंच लक्षात असेल. ही  बिलं  2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा एक भाग होता.  चित्रपटात अनेकवेळा एक डायलॉग होता की, '2 ऑक्टोबरला काय झाले?' यानंतर अजय आणि त्याचे कुटुंबीय याबद्दल सांगतात आणि 2 ऑक्टोबरची सगळी बिलं  दाखवतात. त्यामुळे आता  2 ऑक्टोबर जवळ येताच अजयने टाकलेला हा बिलांचा फोटो पाहून चाहत्यांना खात्रीच पटली होती कि  'दृश्यम 2' लवकरच येणार आहे. पण आता अजयने इंस्टाग्रामवर फर्स्ट लुक रिलीज केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगणने सिनेमाचा लुक शेअर करत सांगितले की, ''दृश्यम 2' चित्रपटाचा टीझर उद्या म्हणजेच 28 सप्टेंबरला येणार आहे. यासोबत अजयने लिहिले, "2 आणि 3 ऑक्टोबरला काय घडले ते आठवत नाही का? विजय साळगावकर त्यांच्या कुटुंबासह परतणार आहेत. उद्या टीझर रिलीज होत आहे.''

हेही वाचा - Munmun Dutta : अभिनय नाही तर जेठालालच्या बबिता जींना करायचं होतं 'या' क्षेत्रात काम

'दृश्यम 2' चा टीझर  उद्या रिलीज होणार असून हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.   'दृश्यम' च्या पहिल्या भागाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये आहे. आता दुसरा भाग कसा असेल, तो पहिल्या भागाच्या तोडीस तोड असेल का याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.

First published:

Tags: Ajay devgan, Bollywood actor, Entertainment