मुनमुन दत्ता हीचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथे झाला. आज 'बबिता जी' या नावाने ती भारतभर प्रसिद्ध आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जशी बबिता जीची व्यक्तिरेखा ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे, तशीच खऱ्या आयुष्यातही मुनमुन दत्ता अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे.
मुनमुन दत्ताचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते.
त्यानंतर तिने तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये प्रवेश केला आणि ती गेल्या 15 वर्षांपासून या शोशी जोडली गेली आहे.
टेलिव्हिजनशिवाय मुनमुन दत्ता बॉलीवूड चित्रपटांचाही भाग आहे. मुनमुन दत्ताने 'मुंबई एक्स्प्रेस' आणि 'हॉलिडे' सारख्या चित्रपटात काम केले असले तरी त्यामुळे तिला फारशी ओळख मिळाली नाही.
मुनमुन दत्ताने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती अभ्यासात चांगली असल्याने तिला डॉक्टर बनायचे होते.
पण नशिबाने काही वेगळेच लिहिले होते. त्यानंतर मुनमुन दत्ताने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.