Home /News /entertainment /

भयानक अपघाताने बदललं अभिनेत्रीचं आयुष्य, चेहऱ्यात घुसले होते काचांचे 67 तुकडे

भयानक अपघाताने बदललं अभिनेत्रीचं आयुष्य, चेहऱ्यात घुसले होते काचांचे 67 तुकडे

शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिलं, तेव्हा धक्काच बसला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून काचांचे 67 तुकडे काढले होते.

  मुंबई, 10 जून : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीनं आपलं दुःख अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा एका मुलाखतीत व्यक्त केलं. ज्यानं तिचं करिअर उध्वस्त झालं होतं. एका अपघातानं तिचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं होतं. एवढंच काय तर या अपघातानंतर महिमाला स्वतःचा चेहरा आरशात पाहण्याचीही भीती वाटू लागली होती. अभिनेत्री महिमा चौधरीने 1997 मध्ये ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. मात्र 2010 नंतर ती चित्रपटांमध्ये फारशी झळकलीच नाही. करिअरच्या सुरुवातीलाच तिचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा परिणाम पुढे तिच्या करिअरवरही झाला. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या भीषण अपघाताच्या आठवणी सांगितल्या. महिमानं सांगितलं, ‘ही घटना होती 1999 च्या आसपासची. जेव्हा ती प्रकाश झा यांच्या दिल क्या करे सिनेमाचं काजोल आणि अजय देवगणसोबत शूटिंग करत होती. त्यावेळी स्टुडिओमध्ये जात असतानाच बंगळुरूमध्ये रस्त्यात एका ट्रकने माझ्या कारला जोरात टक्कर दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की त्यात गाडीच्या काचेचे तब्बल 67 तुकडे चेहऱ्यात घुसले होते.’
  महिमा पुढे म्हणाली, ‘या अपघातातून मी मरता मरता वाचले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिलं, तेव्हा धक्काच बसला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून 67 काचांचे तुकडे काढले होते. तो खूप भयानक अनुभव होता. अपघातानंतर बरेच दिवस मला घरीच राहावं लागलं. उजेडात, कॅमेऱ्याच्या लाइटमध्ये जाण्यास बंदी होती. मी स्वत:ला आरशात पाहू शकत नव्हते. त्यावेळी माझ्या हातून चित्रपटांच्या बऱ्याच ऑफर्स निघून गेल्या. अपघाताविषयी मी कोणाला फार काही सांगितलं नाही. कारण त्या काळी लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा होता. हिचा तर चेहरा खराब झाला, दुसऱ्या अभिनेत्रीला साइन करू, असं ते म्हणाले असते.’
  महिमानं 2006 मध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 7 वर्षांनंतर हे दोघं वेगळे झाले. 2013 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना आरियाना नावाची एक मुलगी सुद्धा आहे.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या