मुंबई 3 एप्रिल**:** अजय देवगण (Ajay Devgan) बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळात त्याचा प्रत्येक चित्रपट कोट्यवधींची कमाई करतो. येत्या काळात तो आर.आर.आर. (RRR) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे तो तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मात्र बॉलिवूडच्या या हिरोचा तिथं देखील जलवा पाहायला मिळत आहे. अजयच्या RRR या चित्रपटानं प्रदर्शनाआधीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. RRR या चित्रपटाचं दिग्दर्शन एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या पार्श्वभूमीर RRR देखील तिकिटबारीवर धुमाकूळ घालणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यामुळंच या आगामी चित्रपटाच्या टीव्ही आणि डिजीटल हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरु होती. अखेर या स्पर्धेत जयंतीलाल गाडा विजयी ठरले. त्यांनी 210 कोटी रुपयांमध्ये सर्व हक्क खरेदी केले. शिवाय चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी निर्मात्यांसोबत 50 टक्क्यांचा करार केला आहे. अवश्य पाहा - ‘Shweta Tiwari मला दांड्यानं मारायची’; पतीनं केला गंभीर आरोप एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.