‘Shweta Tiwari मला दांड्यानं मारायची’; पतीनं केला गंभीर आरोप

श्वेता तिवारीच्या आरोपांवर आता अभिनवनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानं घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. (domestic violence accusations)

श्वेता तिवारीच्या आरोपांवर आता अभिनवनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानं घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. (domestic violence accusations)

  • Share this:
    मुंबई 3 एप्रिल: कसौटी झिंदगी की (Kasautii Zindagi Kay) या मालिकेतून नावारुपास आलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अफाट सौंदर्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील सतत चर्चेत असते. अलिकडेच तिनं आपला घटस्फोटित पती अभिनव कोहलीवर (Abhinav Kohli) कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तो तिचा मानसिक आणि शारिरिक छळ करायचा असा आरोप तिनं केला होता. मात्र या आरोपांवर आता अभिनवनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानं घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. (domestic violence accusations) स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत अभिनवनं श्वेतानं केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. तो म्हणाला, “श्वेता खोटं बोलतेय. ती प्रसिद्धीसाठी कोणावरही काहीही आरोप करु शकते. मी तिच्यावर कधीही अत्याचार केलेले नाहीत. हो श्वेताला मी एकदा चापटी मारली होती पण तो प्रकार केवळ एकदाच घडला होता. तो प्रसंग सोडला तर मी श्वेतावर कधीही हात उचललेला नाही. उलट श्वेताच मला दांड्यानं मारायची. तिच्या आरोपांवर कृपया विश्वास ठेवू नका.” अवश्य पाहा - या अभिनेत्रीमुळं मोडला प्रभुदेवाचा संसार; अनैतिक संबंधांविरोधात पत्नीनं केलं होतं उपोषण यापूर्वी काय म्हणाली होती श्वेता तिवारी? “अभिनवसोबत लग्न करणं हा माझा चुकीचा निर्णय होता. त्यानं माझा मानसिक आणि शारिरिक छळ केला आहे. पलकनं लिहिलेल्या एका पत्रातही त्याचा उल्लेख आहे. मुलांच्या मानसिक स्वास्थाचा विचार करुन मी पतीपासून वेगळे झाले. माझा मुलगा केवळ 4 वर्षांचा आहे अन् त्याला पोलीस आणि कोर्ट म्हणजे काय माहिती आहे.” सध्या श्वेता आणि अभिनवमधील वाद कोर्टात सुरु आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published: