मुंबई, 11 जानेवारी: बॉलिवूड (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन केवळ भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत बोलताना कोणीही 10 वेळा विचार करेल. पण कुणीतरी बेकादेशीर अॅपद्वारे (Illegal Application) खुद्द अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नंबर वापरून मेसेज केला आणि एवढंच नाही, तर हा बेकायदेशीर मेसेज मीच केला अशी खुद्द अमिताभ बच्चन यांच्यापुढे नॅशनल टेलिव्हिजनवर (National Television) कबुलीही दिली.
बिग बींना केलेला बेकायदेशीर मेसेज बिग बींसोबत केलेला प्रॅंक होता. कपिल शर्मा (The Kapil Sharm Show) शोमध्ये नुकतंच अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) त्यांच्या आगामी ‘बिग बुल’ (Big Bull) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. दरम्यान कपिलने अभिषेकला सर्वात मस्तीखोर, विनोदी आणि प्रॅंक करणाऱ्या अभिनेत्याबद्दल विचारलं असता, अभिषेकने सांगितलं इंडस्ट्रीतील काही लोकच बिग बींसोबत (Big B) प्रॅंक करतात आणि अजय देवगण त्यांच्यापैकी एक आहे.
तेव्हा अजयने बिग बींसोबतचा एक जुना किस्सा शेअर केला. एकदा बेकायदेशीर मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून बिग बींसोबत अजयने प्रॅंक केला होता. हे अॅप आता भारतात बॅन झालं आहे. या अॅपवरून अजयने स्वतःचा फोनवरुन, पण बिग बींचा नंबर वापरुन पब्लिसिस्टला सकाळी 6 वाजता त्यांच्या घरी येण्याचा मेसेज पाठवला आणि तो पब्लिसिस्ट सकाळी 6 वाजता पोहचला, पण बिग बींनी बिचाऱ्या त्या पब्लिसिस्टला मी मेसेज केलाच नाही म्हणून खडे बोल सुनावले.
When the Bachchans speak, I listen(especially Amitji)🙏🏻 ✊🏼#8YearsOfBolBachchan @SrBachchan @juniorbachchan #RohitShetty pic.twitter.com/c4WRQliIwY
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 6, 2020
बिग बींना त्यांच्यासोबत झालेल्या या प्रँकबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. कित्येक वर्षानंतर अजयने हा किस्सा खुद्द बिग बींना केबीसीच्या (KBC) सेटवर सर्व प्रेक्षकांपुढे सांगितला. अभिषेकने, अजय आपल्या चित्रपटांच्या सेटवरही सगळ्यांच्या खोड्या काढत असल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Ajay devgan, Amitabh Bachchan, Bollywood, Kapil sharma, The kapil sharma show