मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हे दोघेजणं आहेत दीपिकाच्या सर्वात जवळचे; Photo शेअर करून व्यक्त केली भावना

हे दोघेजणं आहेत दीपिकाच्या सर्वात जवळचे; Photo शेअर करून व्यक्त केली भावना

दीपिका पादुकोणने (Deepika padukone) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Instagram story) नुकताच एक फोटो (Photo) शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने या फोटोत आपल्या जवळच्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

दीपिका पादुकोणने (Deepika padukone) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Instagram story) नुकताच एक फोटो (Photo) शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने या फोटोत आपल्या जवळच्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

दीपिका पादुकोणने (Deepika padukone) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Instagram story) नुकताच एक फोटो (Photo) शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने या फोटोत आपल्या जवळच्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

मुंबई, 11 जानेवारी: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ( Deepika Padukone) आपल्या अप्रतिम अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेण्याचा बहुमान नुकताच तिने मिळवला आहे. अनेक आघाडीच्या अभिनेत्याएवढं मानधन दीपिका घेते. तिने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच लाइमलाइटमध्ये राहत असते.

दीपिकाच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला चाहते भरभरून प्रतिसाद देतात. तिच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. देशातील करोडो दर्शक तिच्यावर प्रेम करतात. पण प्रश्न उरतो तो ती कोणावर प्रेम करते. तिचे सर्वात जवळचे व्यक्ती कोण आहेत. अनेकदा तिला हा प्रश्न प्रेक्षकांकडून विचारला जातो. पण आता दीपिकानं या प्रश्नाचं उत्तर स्वतःहून दिलं आहे.

दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने फोटोच कोलाज बनवलं आहे. आपल्या चाहत्यांच्या विनंतीवरून तिने हे फोटोज शेअर केली आहेत. तिच्या एका चाहत्यांनी तिला एक प्रश्न विचारला होत, ज्यामध्ये त्यानं विचारलं होतं की, दीपिकाच्या अगदी जवळच्या व्यक्ती कोण आहेत? चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दीपिकाने 2 फोटोज असलेलं कोलाज शेअर केलं आहे.

अनीशा आणि रणवीर आहेत दीपिकाच्या सर्वात जवळच्या व्यक्ती

दीपिकानं इन्स्टाग्राम स्टोरीत तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनीशा आणि दीपिका एकमेकांना मिठी मारत आहेत. तर दुसरा फोटो दीपिका आणि रणवीरचा आहे. ज्यामध्ये दीपिका रणवीरच्या गालावर किस करत आहे.

हे चित्र शेअर करताना दीपिकानं अनीशा आणि रणवीरला टॅग देखील केलेलं आहे.

दीपिकाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ती शकुन बत्राच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पहिल्यांदाच सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करणार आहे. याशिवाय ती रणवीरच्या 83 मध्येही काम करत आहे. हा चित्रपट क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर अधारित आहे.

या चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Deepika padukone, Ranveer singh