मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त एका कारणामुळे श्वेतानं होकार दिला; आदित्य नारायणनं लव्हस्टोरीबाबत केला खुलासा

फक्त एका कारणामुळे श्वेतानं होकार दिला; आदित्य नारायणनं लव्हस्टोरीबाबत केला खुलासा

श्वेता अग्रवालनं (shweta agarwal) आपल्याला खूप वेळा रिजेक्ट केलं होतं असा खुलासा आदित्य नारायणनं (aditya narayan) केला आहे.

श्वेता अग्रवालनं (shweta agarwal) आपल्याला खूप वेळा रिजेक्ट केलं होतं असा खुलासा आदित्य नारायणनं (aditya narayan) केला आहे.

श्वेता अग्रवालनं (shweta agarwal) आपल्याला खूप वेळा रिजेक्ट केलं होतं असा खुलासा आदित्य नारायणनं (aditya narayan) केला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 जानेवारी : अँकर आणि सिंगर आदित्य नारायण (aditya narayan) आणि श्वेता अग्रवाल (shweta agarwal)  दोघंही 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आदित्यनं पहिल्यांदाच आपली लव्हस्टोरी सर्वांसमोर आणली आहे. श्वेताला लग्नासाठी तयार करणं सोपं नव्हतं. तिनं आपल्याला खूप वेळा रिजेक्ट केलं होतं. पण फक्त एका व्यक्तीमुळे तिनं आपल्याला होकार दिला. आपल्याशी लग्न केलं आणि आज ती आपल्या आयुष्यात आहेक, असा खुलासा आदित्य नारायणनं केलं आहे.

आदित्य आणि श्वेता कमीत कमी दहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. दरम्यान इंडियन आयडलच्या प्रोमोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये आदित्य आणि त्याचंं कुटुंबही आहे. याचवेळी आदित्यनं आपली लव्हस्टोरी सांगितली.

आदित्यनं सांगितलं, श्वेताला पहिल्यांदा पाहिल्यानंतरच तो तिच्या प्रेमात पडला. पण तिनं आपल्याला खूप वाट पाहायला लावली. इतकंच नाही तर तिनं खूप वेळा रिजेक्टही केलं. पण तरी आदित्य तिला मनवत होता. त्यानं खूप वेळा प्रपोज केलं पण तिनं होकार दिला नाही.

अखेर त्यानं आपल्या आईला याबाबत सांगितलं. त्याच्या आईनं सांगितलं की पुन्हा जेव्हा तू श्वेताला भेटशील तेव्हा मला फोन कर. आदित्यनं तसंच केलं आणि आदित्यच्या आईनं श्वेताला फोनवर सांगितलं की आदित्यसोबत डेटवर जा. त्यानंतर श्वेता आणि आदित्य डेटवर गेले आणि तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.

हे वाचा - BMC विरोधात सोनू सूद मुंबई हायकोर्टात; अवैध बांधकामाच्या नोटिशीला दिलं आव्हान

आदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये होते. ऑक्टोबरमध्ये आदित्यने सोशल मीडियावर आपण दोघंही लग्न करणार असल्याचं सांगितलं. श्वेताचा फोटो शेअर करून त्याने, ‘आम्ही विवाह करत आहोत. मी भाग्यवान आहे की, मला श्वेतासारखी साथीदार लाभली. 11 वर्षापूर्वी आम्ही भेटलो आणि आता या डिसेंबरमध्ये आम्ही विवाह करत आहोत. लग्नाच्या तयारीसाठी आम्ही सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घेत आहोत. डिसेंबरमध्ये भेटू’, अशी पोस्ट केली होती.

हे वाचा - शिल्पा शेट्टीनं शेअर केला मजेदार VIDEO, पती राज गाऊ लागताच पहा काय झालं...

1 डिसेंबरला दोघांनीही मुंबईच्या इस्कॉन टेम्पलमध्ये लग्न केलं. लग्नाला त्या दोघांचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. तर 2 डिसेंबला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आदित्य आणि श्वेताचं रिशेप्शन पार पडलं.

First published:

Tags: Bollywood, Tv celebrities