जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nysa Devgn : समोर दारूचा ग्लास अन् बिनधास्त डान्स; अजयच्या लेकीचा तो व्हिडीओ व्हायरल

Nysa Devgn : समोर दारूचा ग्लास अन् बिनधास्त डान्स; अजयच्या लेकीचा तो व्हिडीओ व्हायरल

न्यासा देवगण

न्यासा देवगण

सध्या न्यासाचा असाच एका पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. त्याची प्रचंड चर्चा होतेय. काय आहे त्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 डिसेंबर : अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण सध्या चर्चेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होताना दिसतात.  या स्टारकिड विषयी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. तिच्या चेहऱ्याच्या सर्जरीवरदेखील अनेक वेळा चर्चा होताना दिसते. तिचे पार्टीतील व्हिडीओ तर नेहमीच व्हायरल होतात. सध्या न्यासाचा असाच एका पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. त्याची प्रचंड चर्चा होतेय. काही जणांनी तिचा बिनधास्त अंदाज आवडलाय तर काही जण तिला ट्रोल करत आहेत. काय आहे त्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या. बॉलिवूड स्टार्सच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. बॉलीवूडची जोडपी नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी रवाना झाली असताना, स्टार किड्स देखील पार्टी करण्यात मागे नाहीत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काजोल आणि अजय देवगणची लाडकी न्यासा देवगनही दुबईला पोहोचली आहे. न्यासा तिचा जिवलग मित्र ओरहान अवत्रामणी सोबत तेथे एन्जॉय करत आहे. अशातच त्यांच्या पार्टीशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या समोर दारूचा ग्लास दिसत आहे. आणि न्यासा या पार्टीत बिनधास्त डान्स करत दिसत आहे. हेही वाचा - Laal singh Chaddha: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊनही आता ट्विटरवर ट्रेंड होतोय आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’; हे आहे कारण हे पाहून नेटकाऱ्यानी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली.  नेटकाऱ्यानी थेट काजोलच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे तिच्या समर्थनार्थ काही चाहतेही समोर आले आहेत. तिचं समर्थन करताना ते म्हणतायत की हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे, ती काहीही करू शकते.’  न्यासाचा हा व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

जाहिरात

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी न्यासा देवगन दुबईला पोहोचली आहे. न्यासा तिचा जिवलग मित्र ओरी (ओरहान अवत्रामणी) सोबत येथे आली आहे. ओरहानने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये न्यासा ओरीसोबत शॉर्ट स्कर्टमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये न्यासाची ग्लॅमरस स्टाईलही समोर येत आहे. यासोबतच न्यासाही फोटोंमध्ये दमदार पोज देताना दिसत आहे. न्यासासोबत तान्या श्रॉफही पोहोचली आहे. तिघांनीही त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगन सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. न्यासाचे शालेय शिक्षण मुंबईतून झाले आहे. आता न्यासा सिंगापूरमध्ये राहते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. न्यासा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच न्यासाला ख्रिसमस पार्टीमध्येही स्पॉट करण्यात आले होते. यादरम्यान ओरीही न्यासासोबत दिसली होती. ओरीनेच मीडियासमोर तिचा हात धरून न्यासाला कारमध्ये बसवले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार शेअर केले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात