जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बच्चन कुटुंबाला दिलासा! ऐश्वर्या, जया बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

बच्चन कुटुंबाला दिलासा! ऐश्वर्या, जया बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

बच्चन कुटुंबाला दिलासा! ऐश्वर्या, जया बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

बच्चन कुटुंबीय राहत असलेला जलसा हा बंगला सील करण्यात आला असून त्याला कन्टेंन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. याआधी या तिघींचीही अॅंटीजेन (antigen) रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आता या तिघांचे स्वॅब रिपोर्टही (Swab Report) निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बच्चन कुटुंबीय राहत असलेला जलसा हा बंगला सील करण्यात आला असून त्याला कन्टेंन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जलसामध्ये सध्या पालिकेचे डॉक्टर असून घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. वाचा- कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही अमिताभ बच्चन यांना का केलं रुग्णालयात दाखल? शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. दरम्यान, अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमिताभ यांनी ट्वीट करत, ‘गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया COVID टेस्ट करून घ्यावी’, अशी विनंती त्यांनी Tweet करून केली आहे.’, अशी विनंती केली. वाचा- …आणि बिग बींचा नानावटी रुग्णालयातील तो जुना VIDEO पुन्हा VIRAL त्यानंतर अभिषेक बच्चननं, “मी आणि माझे बाबा कोरोना पॉझिटिव्ह आहोत. आम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही विनंती करतो की, चाहत्यांनी संयम बाळगावा. आम्ही मुंबई महापालिकेच्या संपर्कात आहोत”. असे ट्वीट करत सांगितले होते. दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना सौम्य लक्षणं असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वाचा- Big B नंतर अभिषेक बच्चनसुद्धा Coronapositive; बॉलिवूडला धक्का संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात