मुंबई, 11 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा COVID पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी Tweet करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता COVID चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. बच्चन यांनीच ट्वीटरवरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. ‘गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया COVID टेस्ट करून घ्यावी’, अशी विनंती त्यांनी Tweet करून केली आहे.’
माजी मुख्यमंत्री आणि भाजपने नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यात बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने अख्ख्या बॉलिवूडला धक्का

)







