मुंबई, 30 डिसेंबर: अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनानंतर चित्रपट आणि टीव्ही निर्माता एकता कपूरने सोशल मीडियावर भावनीक पोस्ट शेअर केली आहे. कुशलच्या जाण्यानं ती भावुक झाली. मी हरले. मी कुशलच्या संघर्षाच्या काळात त्याला मदत करू शकले नाही. त्याचा संघर्ष नरकयातनेपेक्षा कमी नव्हता. अशा वेळी मी त्याला कोणतीच मदत करू शकले नाही. अशी भावनिक पोस्ट एकता कपूरने केली आहे. टीव्ही आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबीनं गुरुवारी टोकाचं पाऊल उचलत मुंबईतील राहत्या घरी फाशी घेऊन आपलं जीवन संपवलं. अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनानं सिनेसृष्टी ते इतर सर्वच क्षेत्रातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. 37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चेतननं सांगितलं, ‘हो त्यानं आत्महत्त्या केली. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद होत असतं तिच्यापासून वेगळं होण्याच्या दुःखामुळे तो मागच्या काही दिवसांपासून खूप निराश आणि आजारी सुद्धा होता. काही दिवसांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यानं या गोष्टींचा उल्लेख करत खूप डिस्टर्ब असल्याचंही सांगितलं होतं. मी त्याची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो असं काही करेल असा मी कधीच विचार केला नव्हता.’
कुशलनं नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपीयन गर्लफ्रेंड Audrey Dolhen हिच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना 3 कियान नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. कुशलचं त्याच्या मुलावर प्रचंड प्रेम होत. मात्र पती-पत्नीतील वादांमुळे त्याची पत्नी आणि मुलगा सध्या संघाई येथे राहत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कुशलनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता याच मुलासोबतच्या कुशलच्या फोटोवर एकता कपूरने भावनिक पोस्ट लिहिली आहे. टिव्ही अभिनेता करणवीर बोहराने कुशलच्या निधनाचं वृत्त इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलं होतं. कुशल आणि करणवीर खास मित्र होते.