जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सर्जरी की मेकअपची जादू? कसा लपवला दीपिका पदुकोणने RK टॅटू?

सर्जरी की मेकअपची जादू? कसा लपवला दीपिका पदुकोणने RK टॅटू?

सर्जरी की मेकअपची जादू? कसा लपवला दीपिका पदुकोणने RK टॅटू?

दीपिकाच्या ग्लामरस लूकची नाही तर RK टॅटूची यामुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘छपाक’ हा सिनेमा दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर आधारित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित छपाकमध्ये मालती नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. यामध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियातून मोठी पसंती मिळाली आहे. दुसरीकडे दीपिका आपल्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या लूकमध्ये चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय झाली होती. मात्र नेटकऱ्यांनी दीपिकाच्या टॅटूवरच थेट प्रश्न उपस्थित केले. दीपिका पदुकोण छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडल टीव्ही शोमध्ये पोहोचली. यावेळी तिचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा होता. दीपिका मल्टिकलर पॅच आणि सोनेरी रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली होती. त्यावर तिने बॅकलेस निळ्या रंगाचा ब्लाउज घातला होता. त्यामुळे दीपिकाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप आवडला. ह्या साध्या लूकमध्येही दीपिका ग्लॅमरस दिसत होती. लाइट मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि मेसी लोअर बन हेअरस्टाइलमध्ये दीपिका अधिक खुलून दिसत होती. या सगळ्यात चर्चा होती ती दीपिकाच्या टॅटूची दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो मागून काढला आहे. दीपिकाच्या मानेवर असणारा RK टॅटू मात्र या फोटोत दिसत नसल्यानं दीपिकाने तो काढला का? अशी एक चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दीपिकाने हा टॅटू कसा लपवला असेल असे तर्कही बऱ्याच जणांनी लावले.

जाहिरात

दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूर एकमेकांना डेट करत होते तेव्हा RK हा टॅटू दीपिकाने आपल्या मानेवर गोंदवला होता. त्यांच्या जोडीची बॉलिवूडमध्ये तुफान चर्चा होती. पण हा टॅटू पूर्णपणे गायब झाल्याचं ह्या फोटोतून दिसत आहे. दीपिकाने लेसझ ट्रिटमेंट घेऊन हा टॅटू कायमचा काढून टाकल्याचीही चर्चा आहे.

‘ओम शांति ओम’ मधील शांतिप्रिया असो की मग ‘पद्मावत’मधील पद्मावती. दीपिकानं प्रत्येक भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारली आणि प्रेक्षकांवर आपला वेगळा ठसा उमटवला. यानंतर आता ती लवकरच मेघना गुलजारच्या ‘छपाक’ या सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं ही भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे असं सांगितलं होतं. या भूमिकेबाबत दीपिका खूप भावूक आहे आणि त्यामुळेच शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिला रडू आलं होतं. 22 एप्रिल 2005मध्ये लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. दीपिकानं ‘छपाक’साठी खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ती अनेकदा दिल्लीच्या रस्त्यांवर स्पॉट झाली. सुरुवातीला तर सिनेमातील तिच्या बदललेल्या लुकमुळे तिला ओळखणंही सर्वांना कठीण झालं होतं. या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात