सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'माझ्याही मनात आत्महत्या...'

सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'माझ्याही मनात आत्महत्या...'

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 34 वर्षीय सुशांतनं नैराश्यात आत्महत्या केली.

  • Share this:

मुंबई, 17 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 34 वर्षीय सुशांतनं नैराश्यात आत्महत्या केली. या घटनेवर अनेकांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच बॉलिवूडमध्ये सध्या नपोटिझम हा नवा वाद सुरू झाला आहे. अशात आता 90 च्या दशकातली एक अभिनेत्री दिप्ती नवल यांनी स्वतःच्या डिप्रेशनच्या अनुभवाबद्दल फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देत त्यांनी एक कविता सुद्धा सादर केली आहे. जी त्यांनी त्यांच्या डिप्रेशनच्या लढाई दरम्यान लिहिली होती.

नवल यांनी लिहिलं, या अंधाऱ्या दिवसांत बरंच काही होत आहे... हृदय आणि मेंदू एका ठिकाणी जाऊन थांबले आहे जसं की ते सुन्न झाले आहेत. आज असं वाटतं आहे की मी ती कविता सादर करू जी मी माझ्या कठीण काळात, मनात आत्महत्येचे विचार येत असताना, डिप्रेशनशी लढत असतानाच्या काळात लिहिली होती. अभिनेत्री दिप्ती नवल यांनी 1978 मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'जुनून' सिनेमातून आपल्या किरिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 80 च्या दशकात त्यांनी ‘चश्मे बद्दूर’ , ‘अनकही’, ‘मिर्च मसाला’, ‘साथ-साथ’सारख्या सिनेमांत काम केलं.

माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला, सुशांतच्या आठवणीत कृती सेनन झाली भावुक

दिप्ती नवल यांच्या या कवितेचं शिर्षक आहे 'ब्लॅक विंड' या कवितेत त्यांनी कशाप्रकारे भीती आणि अस्वस्थता एका व्यक्तीला घेरते याचं वर्णन केलं आहे. या कवितेत त्यांनी त्याच्या कठीण काळाविषयी आणि मनात आत्महत्येचे विचार येत असताना लढलेल्या लढाईबद्दल लिहिलं आहे.

त्यांनी लिहिलं,

‘‘व्यग्रता और बेचैनी ने,

दोनों हाथों से पकड़ ली है मेरी गर्दन.....

मेरी आत्मा में बहुत गहरे तक धंसे जा रहे हैं,

इसके नुकीले पंजे.....

सांस लेने को छटपटा रही हूं मैं, अपने बिस्तर के तीखे चारपायों से लिपट कर...

‘टेलिफोन बजता है…नहीं, बंद हो गया…ओह!

कोई बोल क्यों नहीं रहा है?

एक इंसानी आवाज, इस शर्मनाक,

निष्ठुर रात की खाई में…

ये रात जो गहरे अंधकार में डूब गयी है,

और इसने ओढ़ ली है एक बैंगनी नीली सी चादर...

अपने भीतर महसूस कर रही हूं एक गहरा अंधकार .’’

या कवितेत दिप्ती नवल यांनी सांगितलं आहे की, कशाप्रकारे रोज त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण तरीही त्या कशाप्रकारे आपल्या डिप्रेशनशी लढल्या. त्यांनी या कवितेच्या शेवटी सांगितलं आहे की, त्या अखेर या अंधारातून बाहेर पडल्या. ही कविता दिप्ती नवल यांनी 28 जुलै 1991 मध्ये लिहिली होती. मागच्या वर्षीच पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 90 व्या दशकाच्या अखेरीस त्यांना काम मिळणं बंद झालं होतं. जे अपयश सहन करणं त्यांच्यासाठी कठीण जात होतं.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी यांचीही होणार पोलीस चौकशी

दिग्दर्शक अभिनव कश्यपनं सलमान खानवर केले गंभीर आरोप, भाऊ अनुराग म्हणतो...

First published: June 17, 2020, 9:39 AM IST

ताज्या बातम्या