माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला, सुशांतच्या आठवणीत कृती सेनन झाली भावुक

माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला, सुशांतच्या आठवणीत कृती सेनन झाली भावुक

कृती सेनन आणि सुशांत या दोघांनी 'राबता' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती

  • Share this:

मुंबई, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येने सर्वांना दु:खी केले आहे. या अभिनेत्याने रविवारी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

बॉलिवूडपासून ते राजकारणी यांनी सुशांतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर एका चित्रपटात त्याची सहअभिनेत्री असलेली कृती सेनन हिने भावनिक पोस्ट लिहून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवर तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कृती म्हणते - 'सुश ... मला माहित आहे तुझी हुशारीच तुझा सर्वात चांगला मित्र आणि तुझा सर्वात वाईट शत्रू होता. परंतु, या गोष्टीमुळे माझे आयुष्य तुटलं आहे. तुला जगण्यापेक्षा मरणं अधिक सोपं वाटत होतं. तुझ्या त्या कठीण काळात तुझ्यासोबत असे काही लोक असायला हवे होते जे तुला मदत करू शकले असते. जे लोक तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यांना तू दूर करायला नको होतंस. तुला जो काही त्रास होत होता तो मी दूर करू शकली असती तर..परंतु तसं करता आलं नाही. माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला आहे आणि तू सदैव जिवंत राहशील. तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करणं कधीही थांबवू शकत नाही.

अभिनेत्याच्या निधनानंतर कृती सेनन सोशल मीडियावर ट्रोल होत होती. सुशांत सिंहसोबत तिचे जवळचे संबंध होते. मात्र सोशल मीडियावर सुशांत विषयी व्यक्त न झाल्याने नेटिझन्स तिला ट्रोल करीत होते.

सुशांत आणि कृती या दोघांनी मिळून एक चित्रपटही केला होता. आणि चांगलं बॉन्डही शेअर केलं होतं. ट्रोलींगनंतर कृती सेननची बहीण नुपुर सेनन हिने संताप व्यक्त केला आहे.

सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्ती पोहोचली कूपर रुग्णालयात, PHOTOS आले समोर

First published: June 16, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या