पूनम पांडेला जामीन मिळताच मिलिंद सोमणविरोधात पोलिसात तक्रार; NUDE PHOTO मुळे अडचणीत

पूनम पांडेला जामीन मिळताच मिलिंद सोमणविरोधात पोलिसात तक्रार; NUDE PHOTO मुळे अडचणीत

गोव्यात NUDE VIDEO शूट केल्यानं पूनम पांडेला (Poonam pandey) अटक करण्यात आली होती. यानंतर NUDE PHOTO काढणाऱ्या मिलिंद सोमणलाही (Milind soman) ट्रोल केलं जाऊ लागलं.

  • Share this:

पणजी, 06 नोव्हेंबर : न्यूड फोटो (nude photo) आणि व्हिडीओमुळे (nude video) अभिनेत्री पूनम पांडे (poonam pandey) आणि आता अभिनेता मिलिंद सोमणही (milind soman) अडचणीत सापडला आहे. एकिकडे पूनम पांडेला या प्रकरणात जामीन मिळाला आहे. तर दुसरीकडे आता मिलिंद सोमणविरोधात पोलिसात तक्राक दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील (goa) बीचवर न्यूड फोटोकाढून तो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गोवा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

मिलिंद सोमणनं आपल्या वाढदिवशी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. गोव्यातील एका बीचवर तो नग्नावस्थेत धावतानाचा हा फोटो. याबाबत गोवा सुरक्षा मंचाकडून वास्को पोलिसांत सोमण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

View this post on Instagram

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

अशा स्वैर वागण्यानं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्याची बदनामी होत असल्याचं आरएसएसचे माजी सरसंघचालक आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

हे वाचा - गोव्यात NUDE VIDEO शूट करणाऱ्या पूनम पांडेची सुटका; जामीन मिळाला पण...

गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर मिलिंद सोमणलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं.  फिल्ममेकर अपूर्व असरानी याने देखील पोस्ट शेअर कर पूनम पांडेला पाठिंबा दर्शवतत ट्वीट केलं होतं.

"गोव्यामध्ये नुकतेच पूनमने काहीसे तर आणि मिलिंदने संपूर्ण कपडे उतरवले. अश्लीलतेमुळे पांडे आता कायदेशीर संकटात आहे तर 55व्या वर्षीही असे फिट शरीर असणाऱ्या सोमणचे कौतुक होत आहे. मला असे वाटते की आपण न्यूड स्त्रीपेक्षा पुरुषांशी अधिक चांगले वागतो", असं असरानी म्हणाला होता.

हे वाचा - अमृता रावच्या बाळाचं नाव ठरलं! क्युट फोटो शेअर करत चाहत्यांकडे मागितलं गिफ्ट

अपूर्वच्या या पोस्टवर अनेकांनी पूनमला पाठिंबा दर्शवला तर अनेकांनी मिलिंद सोमणच्या फोटोमध्ये अश्लीलता नव्हती हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मिलिंदने बुधवारी त्यांच्या वाढदिवशी हा फोटो शेअर केला होता. त्याची बायको अंकिता हिनेच हा फोटो क्लिक केला होता.

पूनम पांडेला सशर्त जामीन

गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अटकेच्या दुसऱ्याच दिवशी पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बेला गोवा कोर्टाने (goa court) त्यांना सशर्त जामीन (bail) मंजूर केला आहे. 5 नोव्हेंबरला पूनम आणि सॅमला गोवा पोलिसांनी अटक केली. आज सकाळी दोघांनाही गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना जामीन देण्यात आला आहे. पण दोघंही गोव्याबाहेर जाऊ शकत नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम आणि सॅम बॉम्बे दोघांनाही प्रत्येकी 20 हजार रुपये भरावे लागतील. दोघांनी गोव्याबाहेर जाण्याची मुभा नाही. पुढील सहा दिवस दररोज पोलीस ठाण्यात येऊन हजेरी द्यावी लागणार आहे.

Published by: Priya Lad
First published: November 6, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या