पणजी, 06 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (poonam pandey) आणि तिचा पती सॅम बॉम्बेला (sam bombay) गोव्यात न्यूड व्हिडीओ (nude video) शूट केल्यानं अटक करण्यात आली होती. अटकेच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचीही सुटका झाली आहे.गोवा कोर्टाने (goa court) त्यांना सशर्त जामीन (bail) मंजूर केला आहे.
पूनम पांडेनं गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून टिकेची झोड उठली. गोवा सरकारला विरोधकांनी टार्गेट केलं. पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर 5 नोव्हेंबरला पूनम आणि सॅमला गोवा पोलिसांनी अटक केली. आज सकाळी दोघांनाही गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. पण दोघंही गोव्याबाहेर जाऊ शकत नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम आणि सॅम बॉम्बे दोघांनाही प्रत्येकी 20 हजार रुपये भरावे लागतील. दोघांनी गोव्याबाहेर जाण्याची मुभा नाही. पुढील सहा दिवस दररोज पोलीस ठाण्यात येऊन हजेरी द्यावी लागणार आहे.
हे वाचा - साप पकडता पकडता विद्युत जामवालच्या हातात आलं असं काही; VIDEO पाहून बसेल शॉक
पूनम पांडेचा हा वादग्रस्त व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला. या व्हिडीओवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सध्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते, असा आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर उत्तर गोवा पोलिसांनी सिकरी येथील पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली आहे. पोलिसांनी IPC 292 नुसार कारवाई केली आहे. तिला काणकोण येथे नेण्यात आलं.
शिवाय काणकोण पोलीस ठाण्यात पूनमचा हा व्हिडीओ शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसंच याप्रकरणी काणकोण पोलिसातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दोघंही व्हिडीओ शूट करताना घटनास्थळी उपस्थित होते. तसंच जल संसाधन विभानानंही त्याठिकाणी तैनात असणाऱ्या आपल्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
हे वाचा - बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींनी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीबरोबर बांधली लग्नगाठ
पूनम पांडे पहिल्यांदाच वादात अडकली नाही, ती कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनच आहे. अनेकदा तिनं विवादात्मक विधान करुन बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या वेळी पूनम वादात सापडली होती. विश्वचषक सुरु झाल्यावर लगेचच पूनमने सोशल मीडियावर सेमी न्यूड फोटो पोस्ट करत या फोटोंद्वारे मी भारतीय संघाला प्रेरित करत आहे असं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टमुळे बरेच वाद निर्माण झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Goa, Poonam pandey