मुंबई, 05 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल (Amrita Rao) काही दिवसांपूर्वीच आईबाबा झालेत. आता त्यांनी आपल्या बाळाचं (baby= नावही ठेवलं आहे. चाहत्यांना बाळाचं नाव सांगत त्यांनी आपल्या बाळाची पहिली झलकही दाखवली आहे.
अमृता रावने आपल्या सोशल मीडियावर आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. एक नोव्हेंबरला अमृताने एक गोंडस मुलाला जन्म दिला. दोघांनीही सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अमृताच्या बाळाची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते.
बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनंतर अमृताने आपल्या बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे. सोबतच आपल्या बाळाचं नावही सांगितलं आहे. अमृता आणि अनमोलनं आपल्या बाळाचा पूर्ण फोटो दाखवला नाही. तर तिघांचेही हात दिसत आहेत. अमृता, अनमोलनं आपल्या हातात बाळाचा हात धरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला अमृतानं कॅप्शन दिलं आहे, "हॅलो वर्ल्ड. हा आमचा मुलगा वीर. तुम्हा सर्वांचे त्याला आशीर्वाद हवेत आहे"
हे वाचा - बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींनी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीबरोबर बांधली लग्नगाठ
'मैं हूं ना', 'विवाह' असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री अमृता आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी अनमोल यांनी 2016 मध्ये लग्न केलं. त्याआधी 7 वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. अमृता आणि अनमोलने सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. त्यांनी फक्त कुटुंबीयांबरोबर छोटेखानी लग्नसोहळा केला होता. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये अमृता राव शेवटचे 'ठाकरे' या सिनेमात दिसली होती. त्यामध्ये तिने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित होता. अमृताने यामध्ये मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे.
हे वाचा - साप पकडता पकडता विद्युत जामवालच्या हातात आलं असं काही; VIDEO पाहून बसेल शॉक
2020 या वर्षामध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याची एंट्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma), करीना कपूर (Kareena kapoor), अनीता हसनंदानी (Anita Hasnandani)यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी ही Good News दिली आहे. तिघीही प्रेग्नंट आहेत. आता त्याच्या चाहत्यांना त्यांच्या बाळाच्या आगमनाचीही उत्सुकता आहे.