मुंबई, 21 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), सुपरस्टार रजनीकांत (Rajanikanth) यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) डिस्कव्हरी चॅनेलवरील इन टू द वाइल्ड (Into The Wild With Bear Grylls) मध्ये दिसणार आहे. चित्रपटांमध्ये खतरनाक स्टंट करणारा खिलाडी कुमार आता जंगलामध्ये देखील स्टंट्स करणार आहे. अक्षय कुमारने या जंगलसफारीचा टीजर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याने हा टीजर शेअर करताना अशी कॅप्शन दिली आहे की, ‘तुम्हाला वाटते मी वेडा आहे, पण मी इन टू द वाइल्डमध्ये जाण्यासाठी वेडा आहे.’ अक्षय कुमारने हा टीजर शेअर करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता खिलाडी कुमारही जंगलामध्ये थरारक अनुभव घेताना प्रेक्षकांना दिसणार आहे. (हे वाचा- राधिका आपटेचा बोल्ड अंदाज, Beach Vibes देणारा फोटो व्हायरल) अक्षय कुमारने सोशल मीडियावर ही माहिती देताच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. चाहत्यांना या एपिसोडची प्रतीक्षा आहे.
You thinking I mad… but mad only going into the wild. #IntoTheWildWithBearGrylls@BearGrylls @DiscoveryPlusIn @DiscoveryIN pic.twitter.com/q5LXat2xdL
— Akshay Kumar (@akshaykumar) August 21, 2020
बेअर ग्रिल्स (Bear Grylls) बरोबर जंगलसफारी करताना अक्षय कुमार दिसणार आहे. अक्षय कुमार असणारा हा एपिसोड डिस्कव्हरी+ (Discovery+) वर 11 सप्टेंबर रोजी आणि डिस्कव्हरीवर (Discovery) वर 14 सप्टेंबर रोजी दिसणार आहे. या टीजरमध्ये अक्षय कुमार आणि बेअर ग्रिल्स झाडांच्या मोठ्या पारंब्यांवर लटकताना दिसत आहेत. (हे वाचा- सुशांत-सारा होते एकमेकांच्या प्रेमात, बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप?) अक्षय कुमारआधी सुपरस्टार रजनीकांत देखील या कार्यक्रमात दिसले होते. या दोन्ही कलाकारांचे शूटिंग कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये करण्यात आलं आहे. 23 मार्च रोजी रजनीकांत यांचा एपिसोड ऑनएअर गेला होता. दरम्यान गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील Bear Grylls बरोबर या कार्यक्रमामध्ये दिसले होते.