मुंबई, 25 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) वाहतूक नियमांचं उल्लंघन (Break Traffic Rule) केल्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी नुकताच त्याच्याकडून दंड (Fine) आकारला होता. त्यानंतर आता विवेकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये तो पावतीची एक प्रत दाखवत आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करताना त्याने मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे. तसेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, असंही म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये विवेक ऑबेरॉय म्हणाला की, ‘हा मी आहे, ही माझी बाईक आहे आणि आमची पावती फाडली आहे’. त्याच्या हातात दंड आकारल्याची पावतीही दिसत आहे. त्याने सध्या सुरू असलेल्या ट्रेंडमध्ये हात धुवून घेतला आहे. यावेळी ‘पावरी हो रही है’ हा हॅशटॅगही वापरला आहे. विवेकने ज्याप्रकारे हा व्हिडिओ बनविला आहे. त्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला आहे.
14 फेब्रुवारीला विवेक ओबेरॉय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वाहतुकीचे आणि कोविड 19 साथीच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारला होता. विवेकने या पावतीची एक प्रत दाखवत आपल्या दुचाकीसोबत हा व्हिडिओ बनवला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हे ही वाचा- बॉलीवूडवरील धक्कादायक विधानामुळे सीरियल किसर इम्रान हाशमी चर्चेत 14 फेब्रुवारी रोजी विवेक ओबेरॉय आपल्या नवीन बाईकवर पत्नी प्रियांका अल्वा ओबेरॉयसोबत बाहेर राइड करायला गेला होता. यावेळी त्याने हेल्मेट आणि मास्क दोन्ही परिधान केले नव्हते. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पाहून मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केली होती.