Home /News /entertainment /

बॉलीवूडवरील धक्कादायक विधानामुळे सीरियल किसर इम्रान हाशमी चर्चेत

बॉलीवूडवरील धक्कादायक विधानामुळे सीरियल किसर इम्रान हाशमी चर्चेत

इमरान हाशमीने (Emraan Hashmi) बॉलीवूडबद्दल एक मोठं विधान (Statement) केलं आहे. जे वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

    मुंबई, 24 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेता (Bollywood Actor) इमरान हाशमीला (Emraan Hashmi) सीरियल किसर म्हणून ओळखलं जातं. त्याने सुरुवातीला बर्‍याच चित्रपटांत बोल्ड किसिंग सीन (Bold Kissing Scene) देवून मोठ्या पडद्यावर खळबळ उडवली होती. असं असलं तरी इमरानने गेल्या काही काळापासून स्वत: ची ही प्रतिमा पुसायला सुरुवात केली आहे. असं असताना इमरानने बॉलीवूडबद्दल एक मोठं विधान (Statement) केलं आहे. जे वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी स्वतः बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे, असे असूनही त्याने बॉलीवूडचा 'बनावट' (Fake) असा उल्लेख केला आहे. अलीकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, 'काम पूर्ण झाल्यानंतर तो ग्लॅमर आणि चकाकीने भरलेल्या या जगापासून दूर राहतो'. त्याच्या बोलण्यात तथ्यही असावं, कारण बॉलीवूडच्या विविध पार्ट्यांना तो गैरहजर असतो. इमरान हाशमीने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'जेव्हापासून बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याने स्वतः साठी काही नियम बनवले आहेत. इमरान म्हणाला की, बॉलीवूडमधील लोकं नेहमीच तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात, परंतु तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात. त्यामुळे बॉलीवूडमध्ये कोण बरोबर आणि कोण चुकीचं ? हे शोधणं फार कठीण आहे. हे ही वाचा-आईच्या आठवणीत जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट; हस्ताक्षरातील चिठ्ठी केली शेअर 'बॉलीवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो. फक्त माझ्या जुन्या मित्रांमध्येच मला सुरक्षित वाटतं.'  चित्रीकरणाच्या निमित्ताने सेटवर बराच काळ घालवूनही तो चित्रपटसृष्टीपासून थोडंसं अंतर ठेवतो. कदाचित याच कारणामुळे इमरान हाशमीमध्ये अद्याप माणुसकी टिकून आहे, असंही त्याने मुलाखत देताना म्हटलं आहे आहे. इमरान हाशमीचा 'चेहरे' हा चित्रपट 30 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुलाखत देताना त्याने बॉलीवूडची काळी बाजू सांगितली आहे. या चित्रपटात अमिताभ ​​बच्चन आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट एका गूढ कथेवर आधारित असून या चित्रपटात इमरान आणि अमिताभ यांच्यासोबतच अन्नू कपूर, रघुवीर यादव यांच्यासारखे दिग्गज कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood News

    पुढील बातम्या