मुंबई, 07 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. मध्यंतरी क्रिती सेननचं नाव तिचा 'आदिपुरुष'चा सह-कलाकार प्रभास सोबत जोडलं गेलं होतं. क्रिती आणि प्रभास लवकरच 'आदिपुरुष' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात होतं. इतकेच नाही तर प्रभासने आदिपुरुषच्या सेटवर गुडघ्यावर बसून प्रपोज केले आणि क्रितीने त्याला लग्नासाठी 'हो' म्हटले, असा दावाही करण्यात आला होता. मात्र क्रितीने त्या सगळ्या फक्त अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा या दोघांचं नाव चर्चेत आलं आहे.
साऊथचा सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत आहेत की दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता दोन्ही कलाकारांच्या एंगेजमेंटची बातमी समोर येत आहे. विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास आणि क्रितीबद्दल एक ट्विट केली जे चर्चेत आलं आहे.
हेही वाचा - Sidharth-Kiara Wedding : आली समीप लग्नघटिका! आज 'या' वेळेत संपन्न होणार सिद्धार्थ कियाराचा विवाहसोहळा
त्यांनी या ट्विटमध्ये 'कृती सेनन आणि प्रभास पुढील महिन्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत' असा दावा केला आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच प्रभास आणि क्रितीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ही बातमी कळल्यानंतर दोन्ही अभिनेत्यांचे चाहते त्याच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
BREAKING NEWS: #KritiSanon & #Prabhas will get engaged next week in Maldives 🇲🇻!! So Happy for them.
— Umair Sandhu (@UmairSandu) February 5, 2023
कृती आणि प्रभासच्या नात्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा वरुण धवनने झलक दिखला जा या शोमध्ये एक मोठा इशारा दिला होता. क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी तिचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवन याने मोठी हिंट दिली होती. क्रिती सॅनन सध्या तिच्या ‘भेडिया’ या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करत असून मुलाखतीदरम्यान तिने प्रभासचा उल्लेख केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. वरुण धवनने करण जोहरच्या डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा 10 चेष्टेत सांगून टाकलं होतं कि क्रिती प्रभासला डेट करत आहे. यानंतर क्रिती आणि प्रभासच्या नात्याच्या अनेक बातम्या समोर येऊ लागल्या. आता क्रितीने अखेर प्रभास आणि तिच्या नात्याविषयी समोर येत असं काही नसल्याचं सत्य सांगितलं होतं.
दरम्यान, क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी बोललं जात होतं कि, आदिपुरुषच्या सेटवर या दोघांमध्ये पहिल्याच दिवसापासून फार छान बॉंडिंग झालं आहे. प्रभास फारच लाजरा आहे तो आपल्या सह-अभिनेत्रींशी फारसं बोलत नाही.परंतु अभिनेता क्रिती सेननच्या फारच जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे सेटवर बराच वेळ सोबत घालवत होते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. शिवाय शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे संपर्कात आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या नात्याबाबत आत्ताच कोणतीही वाच्यता करायची नाहीय. पण आता दोघे खरंच एंगेजमेंट करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kriti sanon, Prabhas