मुंबई, 07 फेब्रुवारी: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नामुळे सगळ्यांचीच उत्कंठा वाढली आहे. विवाहस्थळी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या लग्नाला चित्रपटसृष्टीपासून ते व्यावसायिक जगतातील बडे सेलिब्रिटी पोहोचले आहेत. काल कियाराची लाडकी मैत्रीण ईशा अंबानी तिच्या पतीसोबत या दोघांच्या लग्नाला पोहचली आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकही जैसलमेरला पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाहुण्यांच्या आगमनाचे व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत. आता सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या ठिकाणच्या तयारीची झलक समोर आली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी विवाहबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या विधींनी कालपासून सुरुवात झाली आहे. संगीत आणि मेहेंदी सोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेसवर रोषणाई करण्यात आली होती. त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा - Kantara :'कांतारा 2' बद्दल रिषभ शेट्टीची मोठी घोषणा; चित्रपटाच्या कथानकाबद्दल केला मोठा खुलासा
राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. याच ठिकाणी दोघांच्या संगीतचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या संगीतासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी सूर्यगड पॅलेस बूक करण्यात आला आहे. या ठिकाणचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये हा पॅलेस गुलाबी व पिवळ्या लाइट्सनी उजळून निघाला होता. तसेच मोठ्या प्रमाणात म्युझिक ऐकू येत होते. दोघांच्या लग्नासाठी हे हॉटेल आकर्षक सजवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
आता येथीलच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये सिद्धार्थच्या वरातीची तयारी सुरु असलेली दिसत आहे. मोठमोठे साउंड नेण्यात येत आहेत, तसेच बँड बाजाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची वेळ समोर आली नसली तरी हे दोघे आज 2 ते 4 या वेळेत फेरे घेणार असं सांगण्यात येत आहे. आज त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.
काल सूर्यगढ पॅलेसचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता ज्यामध्ये या दोघांच्या लग्नाच्या स्थळाची सजावट दिसत होती. इथे लोक काम करताना देखील दिसत आहेत. याशिवाय आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये राजस्थानी मुली पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी लोकनृत्य करताना दिसत होत्या.तसेच भव्य झुंबर, फुलांच्या रांगोळ्या अशी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. आता सगळ्यांचे लक्ष या दोघांच्या लग्नाकडे लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Kiara advani, Sidharth Malhotra