मुंबई, 18 जून :‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादांवरून दिवसेंदिवस वाद वाढतच आहे. चित्रपटात असे अनेक टपोरी टाईप डायलॉग्स आहेत ज्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. काल मनोज यांनी हे डायलॉग्ज मुद्दामच लिहिल्याचं सांगितलं होतं. आजच्या पिढीला रामायण समजण्यासाठी असे डायलॉग लिहिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. आता मनोज त्यांच्या वतीने स्पष्टीकरण दिले असून चित्रपटात असे संवाद का आहेत हे सांगितले आहे. वादग्रस्त डायलॉग लिहिल्यामुळे मनोज मुंतशीर यांना ट्रोल केले जात आहे. ‘आज तक’शी झालेल्या संवादात मनोज मुंतशीर म्हणतात, ‘आम्हाला टार्गेट केले जात आहे. वाल्मिकींनी ‘रामायण’मध्ये जी भाषा लिहिली तीच भाषा आपण प्रामाणिकपणे वापरत आहोत, असे कधीच म्हटले नाही. जर रामायणाच्या शुद्धतेबद्दल बोलायचं तर मला माझी चूक मान्य आहे. मला मग संस्कृतमध्ये लिहायला हवं होतं. पण मी तसं करणार नाही, कारण मला संस्कृत अजिबात येत नाही.’
मनोज मुंतशीर पुढे म्हणतात, ‘पण पवित्रता हे कधीच उद्दिष्ट नव्हते. ज्यांना प्रभू राम कोण हे माहीत नाही अशा मुलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता. मला हे सांगताना वेदना होत आहेत की 10-12 वर्षांच्या मुलांना भगवान रामाबद्दल तितकेच माहित आहे जे त्यांच्या पालकांनी सांगितले. ज्या देशात आपल्याला शाहजहान आणि बाबर यांच्या सात पिढ्या माहीत आहेत आणि प्रभू रामाचे वडील दशरथ हे आपल्याला माहीत आहेत, पण त्यांच्या वडिलांचे नाव माहित नाही. हा चित्रपट तरुणांपर्यंत पोहोचावा, अशी आमची इच्छा होती, तेव्हा आमच्या वडिलधाऱ्यांनी, ज्यांनी रामायण विशेष पद्धतीने पाहिले, वाचले आणि समजून घेतले, त्यांच्या श्रद्धेपासून आपण कुठेतरी भरकटलो असावं, मी त्यांची हात जोडून माफी मागतो. होय, पण ते जाणूनबुजून केलं, चुकून नाही. Adipurush: ‘हनुमानजी बहिरे होते का…? आदिपुरुषच्या वादात ओम राऊतचं ‘ते’ ट्विट व्हायरल; नेटकऱ्यांचा संताप मनोज मुंतशीर शेवटी म्हणाले, ‘जर तुम्ही पाच डायलॉग्स निवडून मला ट्रोल करत असाल तर मी माफी मागतो की हा पूर्णपणे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. मला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. असे काही लोक आहेत ज्यांना आमच्या चित्रपटात अडचण आहे, ज्यांना चित्रपटगृहांमध्ये जय श्री रामच्या घोषणांवर खूप आक्षेप आहे. आज सगळीकडे जय श्री रामचा जयघोष होत आहे. मी मास्क लावून चित्रपट पहिला. तुम्ही ज्या संवादांचा उल्लेख करत आहात त्यावर प्रेक्षक हसत आहेत, टाळ्या वाजवत आहेत, जल्लोष करत आहेत. हे थिएटरमधील वातावरण आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.