जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Adesh Bandekar: सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खोटे मेसेज; आदेश बांदेकरांनी केला खुलासा

Adesh Bandekar: सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खोटे मेसेज; आदेश बांदेकरांनी केला खुलासा

Adesh Bandekar: सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी खोटे मेसेज; आदेश बांदेकरांनी केला खुलासा

भाविकांच्या याच श्रद्धेचा फायदा घेऊन मात्र अनेकवेळा सिद्धिविनायकाच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केली जाते. सध्या असाच प्रकार सुरू असून याबाबत आदेश बांदेकर यांनी खुलासा केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 ऑगस्ट: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. मुंबईतील कानाकोपऱ्यातील हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. अनेकवेळा सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर मोठ मोठ्या रांगा लागलेल्या असतात. भाविक तासंतास मंदिराबाहेर रांगेत उभे असतात. भाविकांच्या याच श्रद्धेचा फायदा घेऊन मात्र अनेकवेळा सिद्धिविनायकाच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल केली जाते. त्यांची फसवणूकही होते. असाच प्रकार सध्या होत असून सोशल मीडियावर सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पैसे घेत जात आहेत. हा प्रकार मंदिर प्रशासनाच्या लक्षात आला असून त्यांनी त्वरित याबाबत कडक पाऊलं उचलली आहेत. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांनी याबाबत खुलासा करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. गेली अनेक दिवस मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.  त्याचप्रमाणे दर्शन घेण्यासाठी काही नंबर देखील दिले गेले आहेत. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजमध्ये ‘या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधा आम्ही गणपतीचं दर्शन करुन देऊ’, असं म्हटलं गेलं आहे. ही माहिती खोटी असून यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन आदेश बांदेकरांनी केलं आहे. हेही वाचा - Amruta Fadanavis: गळ्यात मंगळसूत्र घालायचं सोडून हातात घालण्यामागचं अमृता फडणवीसांचं भन्नाट लॉजिक ऐका आदेश बांदेकरांनी म्हटलंय, ‘सोशल मीडियावर असा खोडसाळपणा सुरू आहे हे मंदिर प्रशासनाच्या लक्षात येताच त्याविरोधात तक्रार दाखल करत आहोत. तुमची कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी अशा कोणत्याही पद्धतीचा अवलंब तुम्ही करू नका. अशा गोष्टी जर तुमच्या निदर्शनास आल्या तर तातडीने सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रशासनाशी संपर्क साधा. याविषयी तक्रार दाखल करा. तुम्ही थेट सिद्धिविनायक मंदिरात येऊन गणपतीचं दर्शन घेऊ शकता’, असं आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

जाहिरात

त्याचप्रमाणे आदेश बांदेकरांनी, भाविकांच्या आरोग्यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांना सावध देखील केलं. सिद्धिविनायक मंदिरात कोणत्याही दिवशी गेलं तरी भाविकांची प्रचंड गर्दी असते. मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सव काळात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळेस मंदिरात प्रवेश करण्यासाठी वेगळी नियमावली तयार केली जाते. त्याविषयी माहिती देखील मंदिराच्या अधिकृत वेब साईटवर देण्यात येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात