मुंबई 8 जुलै: बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथ ची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasi Pannu) तिच्या चित्रपटांइतकीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. नुकताच तिचा नवा चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ (Hasin Dilruba) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचं संदर्भात तिने एक मुलाखत दिली आहे ज्यात तिने मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या. मुलाखतीत तापसीच्या लग्नचाही विषय निघाला तेव्हा त्यावर ही तापसी ने खुलून उत्तरं दिली. तिने तिच्या पालकांच्या तिच्या लग्नाविषयी असलेल्या अपेक्षाही सांगितल्या. (Taapasi Pannu wedding)
वृद्ध व्यक्ती करतोय कियारा अडवाणीची सेवा; Video पाहून भडकले नेटकरीकर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “मी अशा कोणत्याही व्यक्तीशी लग्न करणार नाही ज्याचे माझ्या आई बाबांशी सबंध चांगले नाहीत. मी या बाबतीत त्यांच्याशी अतिशय प्रामाणिक आहे, ज्याच्याशी मी लग्नं करण्याचा विचार केला आहे . कारण माझ्यासोबत नेहमी असं होतं की जर लग्नं करण्याचा विचार आहे तेच मी त्या व्यक्तीवर वेळ आणि शक्ती खर्च करेन. मला कोणाशी टाईमपास करण्यात काही रस नाही.”
‘साज ह्यो तुझा..’, प्रिया मराठेचं नऊवारीतील सौंदर्य पाहून चुकेल हृदयाचा ठोकापुढे तापसी म्हणाली की म्हणून माझे आई बाबा यावर मला म्हणतात की, “बाबा तू फक्त लग्नं कर कोणाशीही कर पण लग्नं कर. त्यांना भीती वाटते की जर मी बिना लग्नाचीच राहिले तर.”
तापसी सध्या बॅडमिंटन प्लेअर आणि कोच मेथियस बोला डेट करत आहे. वर्षाच्या सुरुवातीला तापसी च्या घरावर इन्कम टॅक्सने (Income tax raid) छापा मारला होता तेव्हा मेथियस बोने तिला समर्थन दिलं होतं. तापसी लवकरच मिथाली राज (Mithali Raj) बायोपीक , ‘शाबाश मुट्ठू’ या चित्रपटांत दिसणार आहे. तसेच एका थ्रिलर चित्रपटातही ती दिसणार आहे.