मुंबई 8 जुलै: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हे नाव आता बॉलिवूडसाठी (Bollywood) नवं नाही. कमी काळातच कियाराने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. तर नुकतेच तिने इंडस्ट्रीत 7 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्याचं तिने सेलिब्रेशन देखील केलं होतं. कियारा चा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटिझन्स तिला ट्रोल करत आहेत. नुकतीच कियारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Siddharth Malhotra) घराबाहेर स्पॉट झाली होती. त्यावेळी एका वृध्द संरक्षक व्यक्तीने कियारासाठी कारचा दरवाजा उघडला. तसेच तिला सलाम ही केला. त्यानंतर घाईत असलेली कियारा लगेचच तेथून गेली. (Netizens trolled Kiara Advani)
पण हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिच्यावर फारच संतापले होते. अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. कोणी म्हटलं, ‘दरवाजा स्वतः उघडता येत नाही का? वय बघ त्यांचं’ तर एकाने लिहिलं, ‘तुम्हाला काहीच वाटत नाही का ..त्यांच्याकडून काम करून घेताना.’
रिया चक्रवर्ती इमेज सुधारण्याचा प्रयत्न करतेय? नव्या फोटोंमुळे पुन्हा झाली ट्रोलदरम्यान मागील काही काळापासून सिद्धार्थ आणि कियारा यांच्या अफेअर्सच्या बातम्या येत आहेत. अनेकदा कियारा सिद्धार्थच्या घराजवळ स्पॉट होत आहे. तर लवकरच ते एका चित्रपटात एकत्र झळकणारही आहेत.
कियारा लवकरच ‘शेरशाह’, ‘भूल भुलैया ‘2, ‘जुग जुग जीयो’ आणि शशांक खैतान यांच्या एका चित्रपटही झळकणार आहे. ‘शेरशाह’ (Shershah) चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा एकत्र दिसणार आहेत. शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.