मुंबई, 6 मे- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आज लोकांशी संवाद साधण्यासाठी भोपाळला गेली होती. एका पत्रकार परिषदेत स्वराने भोपाळ येथील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरवर निशाणा साधला. यावेळी स्वरा म्हणाली की, ‘मला ढोंगी लोकांची भीती वाटत नाही. मला नाही वाटत की भगवे कपडे घातल्यावर तुमच्यात काही वेगळी शक्ती येते. प्रज्ञा भगवी वस्त्र घालून हिंदू धर्माचा अपमान करत आहे. प्रज्ञासिंह हिंदू आहे आणि तिच्यावर दहशतवादाचा आरोप आहे. त्यामुळे स्वरा त्यांना हिंदू दहशतवादी मानते. यातच स्वराच्या मते, काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे भोपाळसाठी योग्य उमेदवार आहेत. …म्हणून प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न मोडलं साध्वी प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधत स्वरा म्हणाली की, ‘भगव्या किंवा केशरी रंगाचे कपडे घातल्यावर कोणी संत होत नाही. मीही आज भगवी साडी नेसेन, मग मलाही लोक साध्वी स्वरा भास्कर म्हणतील का? हे शक्य आहे का?’ यावेळी स्वराने काँग्रेसला खुलेपणाने समर्थन देताना म्हटलं की, लोकसभा निवडणुकांसाठीचं काँग्रेसच मेनिफेस्टो तिने वाचलं असून त्या मेनिफेस्टोशी ती पूर्णपणे सहमत आहे. स्वराच्या मते, मेनिफेस्टो हे देशातील प्रत्येक वर्गासाठी असणं आवश्यक आहे. नेटफ्लिक्सचा हा शो पाहून 12 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात नक्की कोण पंतप्रधानासाठी योग्य उमेदवार आहे असा प्रश्न विचारला असता स्वरा म्हणाली की, ‘राहुल संविधान, एकता, रोजगार आणि शेतकऱ्यांबद्दल बोलत आहेत. जर त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतरही याच गोष्टींवर लक्ष दिलं तर ते नक्कीच चांगले पंतप्रधान होऊ शकतात.’ Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का? VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.