• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सनी लिओनी राहणार मुंबईत; खरेदी केलं 16 कोटींचं आलिशान घर

सनी लिओनी राहणार मुंबईत; खरेदी केलं 16 कोटींचं आलिशान घर

मुंबईत 5 बेडरूम्सचे अलिशान घर(Luxurious Apartment) खरेदी केलं आहे. या घराची किंमत तब्बल 16 कोटी रुपये असून,तिच्या महागड्या घराबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे. तिच्या या घराची झलक बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.

 • Share this:
  मुंबई 8 एप्रिल: बोल्ड सीन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone)बॉलीवूडमध्ये(Bollywood)आता आपलं चांगलच बस्तान बसवलं असून,चित्रपटांसह वेबसिरीज,शोज यामध्येही(WebSeries)ती झळकत आहे. स्टायलीश पद्धतीनं राहण्यासाठी प्रसिद्ध असणारी सनी लिओनी सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी सतत ती आपले आकर्षक फोटो,व्हिडिओ शेअर करत असते. आपली मुलं आणि पती यांच्या बरोबरचे फोटोही ती शेअर करत असते. जगभरात तिचे लाखो,करोडो चाहते असून तिच्या फोटो,व्हिडिओजना उस्फूर्त प्रतिसाद देत असतात. सध्या सनी लिओनी तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आली आहे. अलिया भट,जान्हवी कपूर,सोनाक्षी सिन्हा यांच्या पाठोपाठ आता सनी लिओनी हिनं देखील मुंबईत 5 बेडरूम्सचे अलिशान घर(Luxurious Apartment) खरेदी केलं आहे. या घराची किंमत तब्बल 16 कोटी रुपये असून,तिच्या महागड्या घराबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे. तिच्या या घराची झलक बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. सनी लिओनीचे हे अलिशान घर अंधेरी पश्चिममधील(Andheri West)अटलांटीस(Atlantis)नावाच्या बिल्डिंगमध्ये 12 व्या मजल्यावर असून,हे तब्बल 3 हजार 967 चौरस फूट क्षेत्रफळाचं प्रशस्त घर आहे. या अपार्टमेंटमध्ये तीन कार पार्किंग स्लॉट आहेत. मनी कंट्रोल डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार,सनी लिओनी हिनं 28 मार्च रोजी हे घर खरेदी केलं असून ते तिनं आपलं खरं नाव करणजीत कौर वोहरा(Karenjeet Vohra)या नावानं घेतलं आहे. या घराच्या खरेदीसाठी तिनं 48 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी(Stamp Duty)भरली आहे. सध्या कोरोना साथीच्या काळात महाराष्ट्र सरकारनं 31 मार्चपर्यंत स्टॅम्प ड्युटीवर भरघोस सवलत दिली होती. त्यामुळे अनेक लोक घर खरेदीकडं वळले. सनी लिओनी हिनेदेखील या संधीचा फायदा घेत 28 मार्चला घर खरेदीचा व्यवहार पूर्ण केला आहे. अवश्य पाहा - ‘सामान्य माणसाला काम करु का देत नाही?’ लॉकडाउनच्या निर्णयावर अभिनेता संतापला
  View this post on Instagram

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  सध्या सनी लिओनी स्प्लिटसव्हिला(Splits villa)या रिअॅलिटी शोच्या 13 व्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विक्रम भट यांच्या अनामिका(Anamika)या वेबसिरीजमध्येही ती काम करत असून त्याचंदेखील शूटिंग सध्या सुरू आहे. अलीकडेच या वेबसीरीजच्या शूटिंगच्या सेटवर काही गुंडांनी हल्ला केला होता. पैशाच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजतं. या वेबसिरीजमध्ये तिच्यासह अभिनेत्री सोनाली सहगल आहे. सोनाली यात एका प्रशिक्षित किलरची भूमिका साकारत असून या सिरीजमध्ये तिचे भरपूर अॅक्शन सीन आहेत. त्यासाठी तिनं कसून प्रशिक्षण घेतलं आहे.
  First published: