Home /News /entertainment /

Bollywood मधलं धक्कादायक वास्तव; श्रुती हासनने सांगितले तिचे अनुभव

Bollywood मधलं धक्कादायक वास्तव; श्रुती हासनने सांगितले तिचे अनुभव

कमल हसनची मुलगी श्रुती हसनने फिल्म इंडस्ट्रीतील मोठा खुलासा केला आहे. सेटवर तिच्यासोबत नेमक कस वागलं जात होतं याचा खुलासा तिने केला आहे.

  मुंबई,06 मार्च: अभिनेते कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र सध्या श्रुती एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मुलाखतीत तिनं फिल्म इंडस्ट्रीतील धक्कादायक खुलासे केले आहेत. चित्रपटाच्या सेटवर कशी ट्रीटमेंट दिली जाते याविषयी बोलताना श्रुतीनं अनेक किस्से सांगितले आहेत. श्रुती हसनने सेटवर होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी यात सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे श्रुतीनं सेटवर अभिनेते आणि अभिनेत्रींना वेगळी वागणूक दिली जात असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्यांना मिळणाऱ्या सुविधांवर श्रुतीनं सवाल उपस्थित केला आहे. ‘चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याला अधिक महत्त्व दिलं जात. अनेकदा अभिनेत्री याविषयी न बोलता शांत राहतात,’ असा खुलासाही यावेळी तिनं केला आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना श्रुतीनं आणखी एक खुलास केला. आपला चेहरा आणि आडनावामुळे जास्त फायदा झाल्याचं श्रुतीने सांगितल आहे. कमल हासन यांचा दरारा असल्यानं आपल्या वाट्याला कोणी गेलं नसल्याचं तिनं सांगितल आहे. PTI ला दिलेल्या मुलाखतीत श्रुती हासनने अनेक किस्से सांगितले आहेत. आपल्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव आणि आपल्या वडिलांच्या भीतीमुळे लोक दूर राहत असल्याचं श्रुतीनं सांगितलं. चित्रपटांच्या शूटींग दरम्यान सेटवर होणाऱ्या प्रकारातून बाहेर पडणं आपल्याला माहीत असल्याचं ही यावेळी तिनं म्हटलं आहे. तमिळ, तेलगू, आणि हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या श्रुतीनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. वाचा -  आई-वडीलांच्या लग्नाआधीच झाला होता अभिनेत्रीचा जन्म, ब्रेकअपनंतर गेली नशेच्या आहारी

  या मुलाखतीत तिनं इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतरचा किस्सा सांगितला, 'अभिनेत्याला सेटवर खुर्ची दिली जायची. मात्र सुरुवातीच्या काही चित्रपटात काम करताना मला बसण्यासाठी जागा पण दिली नाही, ' असं सांगत तिनं आपला किस्सा सांगितला. यानंतर आता हे चित्र बदललं असल्याचं श्रुतीनं म्हटलं आहे. आज मात्र या इंडस्ट्रीमध्ये सुरक्षित वाटत असल्याचं श्रुतीनं सांगत समाधान व्यक्त केलं आहे. श्रुती हसन सध्या काजोल, नेहा धूपिया यांच्यासोबत स्टार शॉर्ट फिल्म ‘देवी’ मध्ये काम करते आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायावर ही शॉर्ट फिल्म आहे. मध्यंतरी श्रुती हसनने प्लॉस्टिक सर्जरी केल्याची कबूली तिनं सोशल मीडियावरून दिली होती. प्लॉस्टिक सर्जरीवरून श्रुतीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. अन्य बातम्या

  बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

  मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress

  पुढील बातम्या