मुंबई, 28 जानेवारी : साउथ ते बॉलिवूड सिनेमा असा प्रवास करणारी ही अभिनेत्री साऊथच्या सुपरस्टारची मुलगी आहे. ही अभिनेत्री तिच्या बॉलिवूड करिअर पेक्षा तिच्या पर्सनल लाइफमुळेच जास्त चर्चेत राहिली. फार कमी लोकांना माहित आहे की या अभिनेत्रीचा जन्म तिच्या आई-वडीलांच्या लग्नाच्या अगोदरच झाला होता. आज ही अभिनेत्री 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे श्रुती कमल हसन. श्रुतीचं शालेय शिक्षण चेन्नईमध्ये झालं. त्यानंतर तिनं मुंबईच्या सेंट अँड्र्यू कॉलेमधून सायकॉलॉजी विषयाचं शिक्षण पूर्ण केलं. म्युझिक शिकण्यासाठी श्रुती कॅलिफोर्नियाला सुद्धा गेली. तिच्या वडीलांचा सिनेमा चाची 420 मध्ये तिनं एक गाणंही गायलं आहे. श्रुतीनं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यानंतर तिनं ‘लक’ सिनेमातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. तिनं, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘रमैय्या वस्तावैय्या’, ‘वेलकम बॅक’, ‘गब्बर’ यासारख्या सिनेमात काम केलं मात्र या सिनेमातून तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. दीपिका पदुकोणने केली पुढची घोषणा; Instagram स्टोरीमध्ये काय सांगितलं पाहा
श्रुतीचे आई-वडील कमल हसन आणि सारिका हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या दरम्यानं सारिका प्रेग्नन्ट राहिल्या आणि श्रुतीचा जन्म झाला. श्रुतीच्या जन्मानंतर 2 वर्षांनी कमल हसन आणि सारिका यांनी लग्न केलं. लग्नानंतर सारिका यांनी सिने करिअरला रामराम ठोकला आणि 1991 मध्ये त्यांनी दुसरी मुलगी अक्षराला जन्म दिला. अयशस्वी सिने करिअरनंतर श्रुतीचं लव्ह लाइफ सुद्धा खूप वादग्रस्त राहिलं. ती बॉयफ्रेंड मायकल कॉरसेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. ‘आता काय दाखवायचं राहिलंय?’ प्रियांकाचा ग्रॅमी लुक सोशल मीडियावर झाला ट्रोल
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीनं तिच्या ब्रेकअपबद्दल अनेक खुलासे केले. ती म्हणाली, ‘हे नातं संपल्याची मला तक्रार नाही. हा माझ्यासाठी सर्वात चांगला अनुभव होता. मी यातून बऱ्याच गोष्टी शिकले.’ पण ब्रेकअपनंतर श्रुती पूर्णपणे खचली होती. ज्यात ती नशेच्या आहारी गेली आणि तिला तिच्या करिअरपासूनही ब्रेक घ्यावा लागला होता. सध्या श्रुती या सर्वांतून बाहेर पडत असून ती लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुष्का-विराटच्या कमाईत तीनपट वाढ, दोघं मिळून विकत घेऊ शकतात अनेक देश