Home /News /entertainment /

50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला सैफ; लेक सारा म्हणाली, ‘आब्बा आप....’

50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला सैफ; लेक सारा म्हणाली, ‘आब्बा आप....’

करीना आणि सैफला काही दिवसांपूर्वीच दुसरं मूल झालं आहे. त्यावर सैफची मुलगी साराने प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई 17 जून : अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) आपल्या कुटुंबासोबत विशेष विशेष बाँडींग आहे. ती आपल्या आई आणि भावासोबत राहत असली तरीही वडिल सैफ (Saif Ali Khan) आणि लहान भाऊ तैमुरला (Taimur) भेटायला ती येत असते. तर आता तिला आणखी एक लहाण भाऊ झाल्याने त्याला पाहायला ती आली होती. यावेळी तिने घडलेला किस्सा सांगितला होता. न्यूज 18 नेटवर्कला (News18 network) दिलेल्या मुलाखतीत साराने तिचा लहाण भाऊ नक्की कसा आहे हे ही सांगितलं होतं. दरम्यान करीना (Kareena Kapoor) आणि सैफने त्यांच्या लहाण मुलाला मीडियापासून दूरचं ठेवलं आहे. तसेच त्याचा फोटोही पोस्ट केलेला नाही.

  गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

  पण साराने त्याच्याविषयी काही गोष्टी या मुलाखतीत सांगितल्या आहेत. तिने म्हटलं की, “मी त्याच्याकडे पाहिलं, तो एकदम हसू लागला, तेव्हाच मला त्याच्यावर प्रेम झालं. तो एकदम लहान गोंडस बॉल सारखा आहे.”
  पुढे सारा म्हणाली की, “मी नेहमी माझ्या बाबांसोबत  मस्ती करते म्हणत असते की तुम्ही तुमच्या वयाच्या प्रत्येक दशकात बाप झाले आहेत. म्हणजेच विशीत, तिशीत, चाळीशीत आणि पन्नाशीत देखील. करीना आणि माझ्या बाबांचा हा मुलगा त्यांच्या आयुष्यात आणखी आनंद घेऊन येणार आहे. आणि मी खूप आनंदी आहे.”
  साराची करीनासोबतही चांगली मैत्री आहे. त्या एमेकींना नेहमीच सपोर्ट करताना दिसतात. सारा ही तिच्या कामात फार व्यस्त असते मात्र आपल्या कुटुंबाला ती पुरेपूर वेळ देण्याचा प्रयत्न करते. आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहीम सोबतही नेहमीच ट्रिप्सवर जात असते.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Kareena Kapoor, Saif Ali Khan, Sara ali khan

  पुढील बातम्या