'चौकशीसाठी समन मिळालाच नाही', रकुल प्रीत सिंहचा हा दावा; ती कारणं देत असल्याचा NCBचा आरोप

'चौकशीसाठी समन मिळालाच नाही', रकुल प्रीत सिंहचा हा दावा; ती कारणं देत असल्याचा NCBचा आरोप

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हिचे देखील नाव ड्रग केसमध्ये समोर आले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी एनसीबीकडून रकुल प्रीतला समन पाठवण्यात आले होते, पण तिने एनसीबीचे समन मिळाले नसल्याचे सांगितले आहे

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर यामध्ये बॉलिवूडमधील काही मोठी नाव देखील समोर येत आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हिचे देखील नाव यामध्ये समोर आले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी एनसीबीकडून रकुल प्रीतला समन पाठवण्यात आले होते, पण तिने एनसीबीचे समन मिळाले नसल्याचे सांगितले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, रकुल प्रीत याविषयी कारणे देत आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने फोनला देखील प्रतिसाद दिला नाही. तिच्या टीमने मुंबई किंवा हैदराबादमध्ये कोणत्याही प्रकारचे समन मिळाले नसल्याचे म्हटले आहे.

एनसीबीकडून दीपिका पदूकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्यासह रकुल प्रीत सिंहची देखील चौकशी होणार आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या फोनमधून काही चॅट्स समोर आले आहेत. त्याचप्रमाणे याप्रकरणी पेडलर्सच्या केलेल्या चौकशीत या अभिनेत्रींची नावं समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

(हे वाचा-नवाझुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाचा बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप,दाखल केली तक्रार)

एका मीडिया अहवालानुसार एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी अशी माहिती दिली की, रकुल प्रीत सिंहला समन बजावण्यात आले, तिला विविध पद्धतीने संपर्क देखील करण्याचा प्रयत्न केला पण तिने उत्तर दिले नाही. तिने फोन देखील उचलला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ती हैदराबादमध्ये आहे. आजतकने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान सध्या सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना देखील समन पाठवण्यात आला आहे. याप्रकणी डिझायनर सिमोन खंबाटा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली होती. सारा आणि रकुलचे नाव रिया चक्रवर्तीच्या चौकशीत समोर आले होते. तर दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूरचे नाव सुशांतची टॅलेंट एजंट जया साहाच्या फोनमधून रिट्राइव्ह करण्यात आलेल्या WhatsApp chat मधून समोर आले आहे.

(हे वाचा-विकी डोनर फेम अभिनेत्याचे निधन, कॅन्सरशी सुरू असणारी झुंज अखेर संपली)

एनसीबीच्या तपासादरम्यान D N S K अशी नावं समोर आली आहे. त्यामुळे आता एनसीबी त्या दिशेनं आपला तपास सुरू आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 24, 2020, 12:37 PM IST

ताज्या बातम्या