मुंबई, 24 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघांमध्ये तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. दीर्घकाळापासून नवाझ आणि आलिया यांच्यातील वाद सुरू आहेत. आता पुन्हा एकदा नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याची पत्नी आलियाने अभिनेत्याच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. तिने या तक्रारीमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मीडिया अहवालांच्या मते आलिया सिद्दीकीच्या वकिलांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी भादवी कलम 375, 376 (के), 376 (एन), 420 आणि 493 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. आलियाने गेल्या आठवड्यामध्ये एका दुसऱ्या तक्रारीसंदर्भात उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदवला होता. यामध्ये आलियाने नवाझ आणि त्याच्या कुटुंबातील 4 अन्य सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता पोलीस नवाझुद्दीन सिद्दीकीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. (हे वाचा- अभिनेता सुबोध भावेचे Twitter ला अलविदा! फेसबुकबाबत लवकरच घेणार निर्णय) दीर्घकाळापासून या दाम्पत्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यातील भांडण मीडियासमोर आले होते. आता या तक्रारीनंतर पुन्हा एकदा या वादाने डोके वर काढले आहे. आलियाने काही महिन्यांपूर्वी नवाझुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. कोव्हिड-19 मुळे देशभरात लॉकडाऊन असल्याकारणाने नवाझ त्याच्या मुळ गावी बुढाना याठिकाणी राहत आहे. जुलै महिन्यात 27 तारखेला आलियाने मुंबईतील एका पोलीस ठाण्यात नवाझुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण मुंबईतील नसल्याकारणाने ही तक्रार मुजफ्फरनगरमध्ये हस्तांतरित करण्यात आली. (हे वाचा- विकी डोनर फेम अभिनेत्याचे निधन, कॅन्सरशी सुरू असणारी झुंज अखेर संपली) नुकतेच काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या सोशल मीडियावर नवाझुद्दीनच्या नावाने खुले पत्र लिहले होते. ट्विटरवर तिने शेअर केलेल्या या पत्रात तिने नवाझ आणि त्याच्या कुटुंबीयांवर तिखट शब्दात टिका केली होती आणि तिने हे स्पष्ट केले होते की ती तिच्या सासरच्या माणसांसमोर नमते घेणार नाही. आलियाने नवाझचे भाऊ आणि पीआरवर देखील जोरदार टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







