मुंबई, 27 नोव्हेंबर : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. सौरभ अनामिकाची प्रेमळ लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत आता सौरभ आणि अनामिकाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. सगळ्या संकटांवर मात करत अखेर सौरभ आणि अनामिका एकत्र येणार आहेत. सध्या मालिकेतील त्यांचा एक इंटिमेट सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा सिन पाहून प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काय आहे असं त्या सीनमध्ये नक्की पाहूया. सौरभ व अनामिकाने लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता मालिकेला एक रंजक वळण आलं आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत आकाशने एक्झिट घेतल्यावर आता सौरभ व अनामिका एकमेकांच्या अधिक जवळ आलेले दिसत आहेत. याचाच एक व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ काहींना पसंत पडलाय तर काही जण या मालिकेला ट्रोल करत आहेत. हेही वाचा - Hardeek Joshi: लग्न कधी राणा दा? हार्दिक जोशीने केळवणाचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी विचारला प्रश्न झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सौरभ व अनामिका यांचा इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. बेडवरील दोघांचा हा सीन असून अनामिका सौरभला किस करत असताना दिसत आहे. तर दोघांचेही अनेक इंटीमेट सीन या मध्ये दाखले आहेत. त्यांची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. एखाद्या मालिकेत असे सीन दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण काही प्रेक्षकांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
‘संपूर्ण कुटुंब एकत्र बसून मालिका बघतात आणि तुम्ही हे दाखवता, अशा मालिका बंद झाल्या पाहिजेत’, ‘मला वाटते या सीनची काही गरज नव्हती’ अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर प्रेक्षकांनी केल्या आहेत. तर काहींनी या मालिकेचा विषय वेगळा असल्याने त्याचे कौतुक केले आहे.
मालिकेमध्ये सौऱभ व अनामिकाची केमिस्ट्री अधिक फुलत असताना या व्हिडीओने मालिकेत आता पुन्हा नवं वळण लागणार आहे असं दिसतंय. आता सौरभ अनामिकाच्या नात्यातील सगळी संकटं दूर होऊन या दोघांचा नवीन प्रवास पाहायला मिळणार आहे. मालिकेत सौरभ आणि अनामिकाची भूमिका अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर साकारत आहेत. आता या दोघांचा हा सीन पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता यापुढे प्रेक्षक या मालिकेला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.