Home /News /entertainment /

आशुतोषनंतर मयुरी देशमुखच्या आयुष्यात येणार नवा सोबती; दुसऱ्या लग्नाबाबत झाली व्यक्त

आशुतोषनंतर मयुरी देशमुखच्या आयुष्यात येणार नवा सोबती; दुसऱ्या लग्नाबाबत झाली व्यक्त

मागील वर्षी मयुरी देशमुखच्या (mayuri deshmukh) आयुष्यात काही धक्कादायक घटना घडून गेल्या पण त्यातून सावरत तिने पुन्हा एकदा उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली.

    मुंबई 27 एप्रिल : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झी मराठी (zee Marathi) वरील ‘खुलता कळी खुळेना’ या मालिकेतून ती नावारूपास आली होती. तिच्या मानसीच्या भूमिकेने सगळ्यांवरच भूरळ घातली होती. आता मयुरीने हिंदी टेलिव्हिझनवरही पदार्पण केलं आहे. सध्या स्टार प्लस (star plus) वरील ‘इमली’ (Imli)  या मालिकेत ती काम करत आहे. मयुरीच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं. मयुरी आपल्या आयुष्यात यशाची शिखरं गाठतं होती. मालिकेनंतर तिने काही नाटकांत काम केलं होतं आणि ती यशस्वीदेखील ठरली होती. दुसरीकडे सुखाचा संसार सुरू होता. 2016 साली तिने अभिनेता आशुतोष भाकरे (Ashutosh Bhakre) याच्याशी लग्न केलं होतं. पण आशुतोषने अचानक या जगातून एक्झिट घेतली आणि मयुरीच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. आशुतोषने मागील वर्षी जुलै 2020 मध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या सगळ्या वाईट काळातून मयुरीने मोठ्या धाडसाने मार्ग काढला. तर वेळोवेळी ती यावर व्यक्तही झाली. मयुरी सध्या ‘इमली’ लोकप्रिय हिंदी मालिकेत काम करत आहे. या दरम्यान तिने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला (TOI) एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मयुरीने तिच्या आयुष्यात घडून गेलेल्या काही घटनांवर भाष्य केलं आहे. हे वाचा - 'अनेक लोक भूकेने मरत आहेत...' अन्नाचा अपमान केल्याने काजोल झाली ट्रोल मयुरी म्हणाली, "मागील वर्ष 2020 माझ्यासाठी, माझ्या घरातील प्रत्येकासाठी अतिशय कठीण होते. आशुतोष आम्हाला कायमचा सोडून गेला. त्याचं जाण्याचं दुःख हे आभाळ कोसळण्यासारखंच होतं. पण यातून सावरणं गरजेचं होतं. माझ्या कुटुंबातील सर्वांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी या दुःखातून मला बाहेर पडायला मदत केली आणि मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली" पुढे मयुरीने सांगितलं,  "माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे, आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जवळ होता. त्या दोघांमध्ये खूप प्रेम होत. आशुतोषला लहान मुल खूप आवडायची. त्यामुळेच आता तो गेल्यानंतर मी मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. अनेकदा मला दुसरं लग्न करण्याबाबत सतत विचारलं जातं. परंतु मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?" असं मयुरी म्हणाली. हे वाचा - राजीव कपूर यांच्या मालमत्तेसाठी रिमा-रणधीर कपूर कोर्टात मागील वर्षी मयुरीच्या आयुष्यात काही धक्कादायक घटना घडून गेल्या पण त्यातून सावरत तिने पुन्हा एकदा उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली. मयुरी या वाईट संकटातून स्वत:ला सकारात्मकरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Television, Tv actress

    पुढील बातम्या