मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजीव कपूर यांच्या मालमत्तेसाठी रणधीर कपूर आणि बहीण कोर्टात; कपूर खानदानात संपत्तीवरून ड्रामा

राजीव कपूर यांच्या मालमत्तेसाठी रणधीर कपूर आणि बहीण कोर्टात; कपूर खानदानात संपत्तीवरून ड्रामा

Bollywood Kapoor Family: कपूर भांवडापैकी फक्त रणधीर कपूर (Randhir Kapoor) आणि रिमा जैन (Rima Jain) हे हयात आहेत. त्यामुळे राजीव यांची संपूर्ण मालमत्ता ही त्यांची बहिण रिमा जैन आणि भाऊ रणधीर कपूर यांना मिळावी असा दावा त्यांनी केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 27 एप्रिल : बॉलिवूडचं प्रसिद्ध कपूर कुटुंब (Kapoor Family) सध्या एका कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि त्यांच्या भावंडापैकी सर्वात लहान भाऊ राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांचं काहीचं दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळे त्यांची संपूर्ण मालमत्ता आता नक्की कोणाच्या मालकीची होणार यावरून प्रकरण हे कोर्टात पोहोचलं आहे.

कपूर भांवडापैकी रितू नंदा, राजीव कपूर, रिमा जैन, रणधीर कपूर, ऋषी कपूर यांतील फक्त रणधीर कपूर (Randhir Kapoor) आणि रिमा जैन (Rima Jain)  हे हयात आहेत. तर अभिनेते ऋषी कपूर यांचं मागील वर्षी निधन झालं. त्याआधी रितू नंदा यांचं निधन झालं होतं. आता फेब्रुवारी महिन्यात त्यांचा सर्वात लहान भाऊ राजीव कपूर यांचंही निधन झालं. त्यामुळे राजीव यांची संपूर्ण मालमत्ता ही त्यांची बहीण रिमा जैन आणि भाऊ रणधीर कपूर यांना मिळावी असा दावा त्यांनी केला आहे.

(हे वाचा - सैफ-करिनाच्या लग्नात खूश नव्हत्या शर्मिला टागोर, हे होतं कारण)

राजीव कपूर हे चित्रपटांत दिसत नसल्याने त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी अनेकांना माहिती नाही. त्यांचे आपल्या पत्नी सोबत अनेक मतभेद होते, त्यामुळे ते कधीच एकत्र दिसले नाहीत. रणधीर कपूर आणि रिमा जैन यांच्या वकिलाने हे दोघेच राजीव यांच्या मालमत्तेचे अधिकारी आहेत असं म्हटलं आहे. कोर्टाने रिमा आणि रणधीर यांना, राजीव यांच्या घटस्फोटाचे कागदपत्र सादर करायला सांगितले आहेत.

राजीव कपूर यांचा विवाह 2001 मध्ये आरती सबरवाल यांच्याशी झाला होता. पण एकमेकांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी 2003 मध्ये घटस्पोट घेतला. कोर्टात रिमा आणि रणधीर यांच्या वकिलांनी घटस्फोटाची कागदपत्रं रिमा आणि रणधीर कपूर यांच्याकडे नसल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी नक्की कोणत्या फॅमिली कोर्टातून घटस्फोट घेतला होता हे ही माहीत नसल्याचं ते म्हणाले.

(हे वाचा - माजी काँग्रेस प्रवक्ती असलेल्या अभिनेत्रीने राजकारण आणि सिनेसृष्टीलाही केला राम राम!)

घटस्फोटाचे पेपर्स मिळत नसल्याने ही कागदपत्र सादर न करण्याची सूट देण्यात यावी असा अर्ज कोर्टात केला आहे. न्यायालयाने रणधीर आणि रिमा यांचा हा अर्ज स्वीकारला आहे. पण न्यायाधीश गौतम यांनी रणधीर आणि रिमा यांनी स्वीकृती पत्र देण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी सध्या सुनावणी स्थगित केली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Raj kapoor