मुंबई, 30 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या फिटनेसची सतत सोशल मीडियावर चर्चा असते. मात्र बऱ्याचवेळा आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल देखील होतं असते. मलायका सतत विविध ठिकाणी स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्टसमध्ये दिसून येते. पुन्हा एकदा ती आपल्या याचा ड्रेसिंगमुळे ट्रोल (Troll) होताना दिसत आहे.
नुकताच मलायका अरोरा मुंबईमध्ये एके ठिकाणी दिसून आली. यावेळी अनेक पापाराझीनी तिला आपल्या कॅमेरात कैद केलं आहे. असाच एक व्हिडीओ इन्स्टा बॉलिवूडने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. यामध्ये मलायका हातात पाण्याची बॉटल आणि एक बॉक्स घेऊन येताना दिसत आहे. येऊन ती आपल्या कारमध्ये बसते आणि बसता बसता कॅमेरालासुद्धा हात उचलून प्रतिसाद देते. असा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने स्पोर्ट्स ब्रा आणि शोर्टस घातले आहेत. (हे वाचा: सोशल मीडियावरही नोरा फतेहीचा बोलबाला; कमी कालावधीत गाठला लाखो फॉलोअर्सचा पल्ला ) त्यामुळे पुन्हा एकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आली. अनेकांनी चक्क मलायकाला दुसरे कपडे आहेत की नाहीत घालायला असा सवालचं केला आहे. तर काही ट्रोलर्सनी पन्नाशीत असूनही कपडे घालायचा सेन्स नाही असंदेखील म्हटलं आहे. तर काहींनी थेट मलायकाची अक्कलदेखील काढली आहे. या व्हिडीओवर मलायकाला असे अनेक ट्रोल करणारे कमेंट्स आले आहेत. त्यामुळे तिचा हा हॉट आणिबोल्ड अंदाज पुन्हा तिच्या अंगाशी आलेला दिसत आहे. (हे वाचा: विवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खु ) मलायका अरोरा 47 व्या वर्षीसुद्धा खुपचं फिट आहे. ती सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येते. तिला अनेक तरुणी स्टाईल आयकॉन समजतात. तिचा स्टाईल फॉलो करतात. मलायका सतत आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. तर दुसरीकडे ती अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळेसुद्धा बरीच चर्चेत असते,.

)







