मुंबई 6 जुलै: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) सध्या चित्रपटांत जास्त दिसत नसल्या तरीही सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. याशिवाय त्यांचे भन्नाट डान्स व्हिडिओ ही शेअर करत असतात.
किशोरी यांनी यावेळी त्यांच्या मुलासोबत डान्स केला आहे. आई- मुलाची ही धमाल डान्स केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनाही फारच आवडत आहे. किशोरी यांचा मुलगा बॉबी वीज (Bobby Vij) हा देखील उत्तम डान्सर , अभिनेता आणि मॉडेल आहे.
'हा माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता'; करण जोहर दिसणार वेगळ्या अवतारात
किशोरी या सोशल मीडियावर (Social media) फारच सक्रिय असतात. त्यांचे अनेक धम्माल व्हिडिओ पाहायला मिळतात. ‘कोंबडी पळाली’ या सुपरहिट गाण्यावर त्यांनी मुलासोबत डान्स केला आहे. व ‘मुलासोबत पहिलं रील’ असं कॅप्शन (Caption) त्यांनी दिलं आहे.
View this post on Instagram
किशोरी सध्या ‘गुम है किसिके प्यार में’ (Gum hai kisike pyar me) या हिंदी मालिकेत काम करत आहेत. त्यातील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरत आहे.
View this post on Instagram
याशिवाय किशोरी आपल्या फिटनेस वरही फार लक्ष देताना वयाच्या 53 व्या वर्षीही त्या अतिशय फिट आहेत. सोशल मीडिया वर त्यांचे अनेक फिटनेस व्हिडिओ त्या शेअर करत असतात.
View this post on Instagram
अनेक मराठी, हिंदी चित्रपटात किशोरी यांनी काम केलं आहे. 2015 मध्ये ‘क्लासमेट्स’ या मराठी चित्रपटात त्या दिसल्या होत्या. तर त्यानंतर काही हिंदी चित्रपटांत त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. तसेच मालिकांतही त्या काम करत आहेत. ‘बिग बॉस मराठी’मधील (Big Boss) त्यांच्या एन्ट्रीनंतर त्या फारच चर्चेत होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Serial, Tv serial, TV serials