मुंबई 6 जुलै: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आता गेली पाच वर्षे केवळ निर्मितीवर लक्ष केंद्रित करत होता. पण आता त्याने पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. तर पुन्हा एकदा हटके स्टोरी घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर आपल्या करिअवर बोलताना व पुन्हा एकदा दिग्दर्शनकडे वळणार असल्याचं सांगत त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत त्याने म्हटलं आहे, ‘ही एका नव्या गोष्टीची सुरूवात आहे. सोबतच माझा घरी येण्याचा रस्ता आहे. ही माझ्या आवडत्या ठिकाणी परतण्याची वेळ आहे. ही लेंसच्या मागून प्रेमकहानी बनवण्याची वेळ आहे.’
HBD: 'या' प्रसिद्ध क्रिकेटरने रणवीरला कोचिंग देण्यास दिला होता नकार
पुढे करणने त्याच्या आगामी दिग्दर्शित चित्रपटाविषयी बोलताना सांगीतलं आहे की, एक खूपचं खास गोष्ट आहे, ‘जी प्रेम आणि कुटुंबाशी संबधीत आहे.’ तब्बल पाच वर्षे करणने दिग्दर्शनातून ब्रेक घेतला होता. त्याच्या धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) या प्रोडक्शन हाऊसमधून दरवर्षी काही चित्रपटांची निर्मिती होते. तर आता करण स्वतः त्याच्या आगामी चित्रपटाकडे लक्ष देणार आहे.
This is the beginning of a new journey & my way back home - all at once. It's time to go back to my favourite place, it's time to create some eternal love stories from behind the lens. A very special story, truly immersed in the roots of love and family. pic.twitter.com/5XE6ebtnNJ
— Karan Johar (@karanjohar) July 5, 2021
पाच वर्षांपूर्वी शेवटी त्याने ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ज्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा, रणबिर कपूर, ऐश्वर्या राय, फवाद खान हे कलाकार होते. तर आता पुन्हा एकदा करण नवी स्टोरी घेऊन येत आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये, करण जोहरने घोषणा केली होती की तो रणवीर सिंग, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विक्की कौशल, भूमि पेडणेकर, जाह्नवी कपूर आणि अनिल कपूर या स्टारकास्टसोबत ‘तख्त’ (Takhta) हा चित्रपट करणार आहे. मात्र अद्याप चित्रपटाची कोणतीही अपडेट आलेली नाही.
याशिवाय त्याने रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबतही नवी लव्ह स्टोरी आणण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता करण जोहरचा हा आगामी चित्रपट कोणता असणार याकडे साऱ्यांचचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Karan Johar