मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शरद पवार यांनाही 'त्या' प्रकरणात प्रतिवादी करा; केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती

शरद पवार यांनाही 'त्या' प्रकरणात प्रतिवादी करा; केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती

केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती

केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती

अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना प्रतिवादी करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी अभिनेत्री केतकी चितळेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यात तक्रारींमध्ये शरद पवार यांनाही प्रतिवादी करा, अशी विनंती केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. केतकीविरोधात एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात तिला जामीन मिळाला असून अन्य गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. अटकेला आव्हान देण्यासह तिच्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी केतकीने याचिका केली आहे.

शरद पवारांना प्रतिवादी करण्याची मागणी

गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवारांना प्रतिवादी करण्याची मागणी करत केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 जानेवारीला मुंबई न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल केतकीविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यापैकी शरद पवारांनी एकही तक्रार स्वत: दिलेली नाही. त्यामुळे त्यांनाही यात प्रतिवादी करण्याची मागणी केतकी चितळे हिने केली आहे. बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे या आरोपांतर्गत तिच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाचा - 'मातोश्रीला गेली 25 वर्षे टक्केवारीचा अनुभव, त्यामुळे आदित्य..' प्रवीण दरेकरांची गंभीर आरोप

नववर्षात पुन्हा वादग्रस्त विधान

अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिची मतं सोशल मीडियावर मांडत असते. 2022 मध्ये केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलमध्ये जावं लागलं होतं. काही दिवसांपूर्वी केतकीनं फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसतेय

हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, 'फादर त्या सगळ्यांना माफ करा. कारण त्यांना माहिती नाहीये ते काय करत आहेत. ती काही चुकीचं बोलत असेन तर मला नक्की सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है. सगळ्यांना माफ करा पण कझी विसरू नका'.

First published:

Tags: Sharad Pawar