मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तैमूर बाबासोबत शेतात करतोय मदत, PHOTO ची होतेय मोठी चर्चा

तैमूर बाबासोबत शेतात करतोय मदत, PHOTO ची होतेय मोठी चर्चा

 4 वर्षांचा तैमूर चक्क शेती करताना दिसत आहे. बाबा सैफ अली खान सोबत तो शेतात काम करत आहे. (Taimur working in farm)

4 वर्षांचा तैमूर चक्क शेती करताना दिसत आहे. बाबा सैफ अली खान सोबत तो शेतात काम करत आहे. (Taimur working in farm)

4 वर्षांचा तैमूर चक्क शेती करताना दिसत आहे. बाबा सैफ अली खान सोबत तो शेतात काम करत आहे. (Taimur working in farm)

  • Published by:  News Digital

मुंबई 25 एप्रिल : अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा तैमूर (Taimur Ali Khan) अगदी त्याचा जन्मापासूनच चर्चेत आहे. तसेच लहान वयातच त्याचे चाहते देखिल निर्माण झालेत. तर आता 4 वर्षांचा तैमूर चक्क शेती करताना दिसत आहे. बाबा सैफ अली खान सोबत तो शेतात काम करत आहे. (Taimur working in farm)

करिनाने आपल्या लाडक्या मुलाचा आणि पती सैफचा हा फोटो शेअर केला आहे. नुकताच वसुंधरा दिवस (world earth day) पार पडला. त्यानिमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. तर चाहत्यांनी फोटोवर भरभरून लाइक्स तसेच कमेंट्स केल्या आहेत. तर या फोटोला कॅप्शन देत तिने ‘आणखी झाडे लावा, या वसुंधरा दिनाला झाडे वाचवा असं लिहिलं आहे’. तैमूरचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यांच कौतुकही होत आहे.

करिना नुकतीच दुसऱ्यांदा आई बनली आहे. त्यामुळे ती संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे.

फेब्रुवारी मध्ये तिने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. काहीच दिवसांपूर्वी ती सोशल मीडियावर (social media) आली असून सध्या ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तर निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.

'मलायकाने सांगितलेल्या या व्यायामामुळे मी केली कोरोनावर मात'; VIDEO शेअर करून वरुण धवनने सांगितला उपाय

काही दिवसांपूर्वी करिनाने तिच्या संपूर्ण कुटुंबाचा अर्थात सैफ , तैमूर, दुसरा मुलगा आणि स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. पण अद्याप तिने तिच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा उघड केला नाही तर त्याचा चेहरा जाणीवपूर्वक झाकण्यात आला होता. याशिवाय त्याच नावही जाहीर करण्यात आलं नाही.

First published:

Tags: Entertainment, Kareena Kapoor, Saif Ali Khan, Taimur ali khan