जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'जेव्हा मला ब्रा साइज विचारली जाते' Body Shaming वर अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर की...

'जेव्हा मला ब्रा साइज विचारली जाते' Body Shaming वर अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर की...

'जेव्हा मला ब्रा साइज विचारली जाते' Body Shaming वर अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर की...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सयांतनी घोषला बॉडिशेमिंगचा सामना करावा लागला होता. एका युजरने तिला ब्रा साइज विचारल्याने तिने या विषयावर व्यक्त होत पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल : हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री सयांतनी घोष (Sayanatani Ghosh) हीने बॉडीशेमिंग (bodyshaming) वर भाष्य केलं आहे. नुकताच तिला इन्स्टाग्रामवर एका युजरकडून या गोष्टीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिने एक मोठी पोस्ट लिहून त्यावर भाष्य केलं होतं. पण त्यानंतर एका मुलाखतीत तिने तिला आलेल्या आणखी अनुभवांबद्दल देखील सांगितलं आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच या गोष्टींचा सामना करावा लागल्याचंही तिने स्पष्ट केलं अनेक हिंदी मालिकांमध्ये संयातनीने काम केलं आहे. पण तिने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. टाईम्स ऑफ इंडिया (TOI)  ला दिलेल्या एका मुलाखतीत संयातनीने बॉडीशेमिंग विषयी काही खुलासे केले आहेत. “जेव्हा मी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली मी फार लहान होते. लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पहायचे आणि कमेंट्स पास करायचे. लोकांना हे समजत नाही की हे एखाद्या व्यक्तीला किती नुकसान पोहोचवू शकतं.” संयातनी म्हणाली.

(वाचा -  ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्याचा हॉट अवतार; PHOTO पाहूनच क्लिन बोल्ड व्हाल )

संयातनीला नुकतंच पुन्हा एकदा बॉडीशेमिंगला सामोरं जावं लागलं. एका युजरने तिला ब्रा साइज विचारली. त्यानंतर तिने एक पोस्ट लिहीली होती. त्या कमेंट विषयी बोलताना संयातनी म्हणाली “अशा गलिच्छ कमेंट्सची ही काही माझी पहिलीच वेळ नाही. केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक महिला म्हणून देखील माझ्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात, कमेंट्स पास करतात. इतकी वर्षे मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मी बोलायला घाबरत होते म्हणून नाही तर मला अशा गोष्टींना विशेष महत्त्व द्यायचं नव्हतं”.

जाहिरात

असे अनेक खुलासे संयातनीने तिच्या मुलाखतीत केले. संयातनी सध्या ‘तेरा यार हूँ मै’ (tera yaar hun mai)  या सब टिव्हीच्या मालिकेत काम करत आहे. 2006 मध्ये सयांतनिने टिव्ही विश्वात पदार्पण केलं होत. कुमकुम (Kumkum), घर एक सपना, नागिन (Nagin), महाभारत, ससूराल सिमर का, कुबूल है, करण संगिनी , बॅरिस्टर बाबू अशा लोकप्रिय मालिंकांमध्ये ती झळकली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात