मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कार्तिक आर्यनने सार्वजनिक ठिकाणी 'हा' स्टंट करण्यास केली मनाई, काय आहे कारण?

कार्तिक आर्यनने सार्वजनिक ठिकाणी 'हा' स्टंट करण्यास केली मनाई, काय आहे कारण?

सध्या देशामध्ये कोरोनाने(Coronavirus)  हाहाकार माजवला आहे. या काळात अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना वेगवेगळे आवाहन करताना दिसत आहे. नुकताच कार्तिक आर्यनने सुद्धा एक फोटो पोस्ट(Instagram Photo Post)  करत चाहत्यांना सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 एप्रिल : बॉलीवूड अभिनेता(Bollywood Actor) कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) अगदी कमी वेळेत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तरुणाईमध्ये कार्तिक आर्यनची मोठी क्रेझ आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कार्तिक आर्यन सोशल मीडियावर सुद्धा खुपचं सक्रीय असतो. तो आपल्या दररोजच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेयर करत असतो. सध्या देशामध्ये कोरोनाने(Coronavirus)  हाहाकार माजवला आहे. या काळात अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना वेगवेगळे आवाहन करताना दिसत आहे. नुकताच कार्तिक आर्यनने सुद्धा एक फोटो पोस्ट(Instagram Photo Post)  करत चाहत्यांना सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे. पाहूया काय आहे नेमका संदेश,

इतर कलाकारांप्रमाणे कार्तिकने सुद्धा आपल्या चाहत्यांना मास्क आणि इतर दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. कार्तिकने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने गळ्याभोवती एक स्कार्फ गुंडाळला आहे. आणि तो हाताने तोंडावरून खाली केला आहे. त्यासोबत कॅप्शन लिहित म्हटलं आहे,’ याचा सार्वजनिक ठिकाणी अवलंब करू नका’ म्हणजेच कार्तिकला यातून असं सुचवायचं आहे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरा मास्क अजिबात काढू नका, सुरक्षिततेच्या सर्व दक्षता पाळा.

काही चाहत्यांनी यासाठी कार्तिकचं मोठं कौतुक केलं आहे. तसेच त्याच्या फोटोवर सुद्धा खुपचं चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे, ‘आम्ही प्रयत्न केला तरी तुमच्यासारखे दिसू शकत नाही, त्यापेक्षा आम्ही मास्कचं वापरलेला बरं’. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे, ‘परफेक्ट पिक्चर’.

(हे वाचा: आयशा जुल्कानं का घेतला आई न होण्याचा निर्णय; 17 वर्षानंतर केला खुलासा )

काही दिवसांपूर्वीच कार्तिकने सोशल मीडियावरून प्रयागराजच्या मित्रासाठी अम्ब्युलंसच्या मदतीसाठी आवाहन केलं होतं. आणि त्याला लगेच मदतसुद्धा मिळाली होती. याबद्दल त्याने सोशल मीडियावरून आभारही व्यक्त केले होते.

(हे वाचा:रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव)

कार्तिकने मदतीसाठी सर्वांचे आभार मानले होते, त्याचबरोबर सर्वांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं होतं. धर्मा प्रोडक्शनच्या ‘दोस्ताना 2’ चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर कार्तिकचा हा पहिलाच ट्वीट होता.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Marathi entertainment