Home /News /entertainment /

किराणा-भाजी घेऊन घरी आल्यावर काय-काय करायचं? हीना खानची शिकवणी तुफान हिट

किराणा-भाजी घेऊन घरी आल्यावर काय-काय करायचं? हीना खानची शिकवणी तुफान हिट

शेकडो लोकांनी हाताळलेल्या या वस्तूंमधून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे या वस्तू आणि पदार्थ विषाणूमुक्त कसे करायचे याची शिकवणीच हीनाने या व्हिडीओतून दिली आहे.

  मुंबई, 3 एप्रिल : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी हीना खान सध्या टीव्हीबरोबरच बॉलिवूडमध्येही पदार्पण केल्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. Coronavirus ची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याची जागृती करण्यासाठी हिना खानने एक VIDEO तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तो सध्या तुफान हिट झाला आहे. फळं-भाज्या आणि दूध-किराणा या अत्यावश्यक गोष्टींची खरेदी करायला तुम्ही बाहेर पडलात, तर घरी आल्यानंतर कायकाय काळजी घ्यायची? शेकडो लोकांनी हाताळलेल्या या वस्तूंमधून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे या वस्तू आणि पदार्थ विषाणूमुक्त कसे करायचे याची शिकवणीच हीनाने या व्हिडीओतून दिली आहे. बाहेरून आल्यानंतर कपडे बदलण्याची गरज आहे? फळं-भाज्यांवर असू शकतो कोरोना, अशा वस्तू घरी नेल्यावर सर्वात आधी काय करावं या प्रश्नांची उत्तरं हीनाच्या या व्हिडीओतून मिळतात.

  टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून हीना ओळखली जाते. कधी तिच्या स्टाइल सेन्स तर कधी फिटनेसमुळे हिनाची सोशल मीडियावर चर्चा होते. ती एका एपिसोडसाठी 1 ते 1.25 लाख रुपये एवढी फी घेते, अशी चर्चा आहे. हीना खान मुंबईमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते आणि हा तिचा स्वतःचा फ्लॅट आहे. हिना तिची सर्व फोटोशूट बहुदा तिच्या घरीच करते. हाही व्हिडीओ तिच्या घरचाच आहे आणि भावाने शूट केला आहे.

  अन्य बातम्या

  घटस्फोटाच्या रात्री काय घडलं? मलायका अरोरानं तब्बल 4 वर्षांनंतर केला खुलासा 'सतत नका दोष काढू! घरात राहून पणती लावायचीय...' शशांक केतकरची प्रतिक्रिया
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या