Home /News /entertainment /

‘त्या’ लहानग्याने नोरा फतेहीला रडवंल, पाहा काय झालं डान्स दिवानेच्या मंचावर

‘त्या’ लहानग्याने नोरा फतेहीला रडवंल, पाहा काय झालं डान्स दिवानेच्या मंचावर

नोरा फतेही (Nora Fatehi) देखिल या शो मध्ये गेस्ट जज म्हणून भूमिका साकारत आहे. सध्या नोराचा मंचावरील एक इमोशनल व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  मुंबई 8 मे : कलर्स टिव्ही (Colors TV) वरील लोकप्रिय रियॅलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ (Dance Deewane 3) मध्ये प्रत्येक वेळी निराळे आणि भन्नाट असे डान्स परफॉर्मन्सेस पाहायला मिळतात. अभिनेत्री , डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) देखिल या शो मध्ये गेस्ट जज म्हणून भूमिका साकारत आहे. अभिनेत्री माधूरी दिक्षित (Madhuri Dixit) देखिल शो मध्ये होती पण सध्या माधूरीने एक्झिट घेतली आहे. सध्या नोराचा मंचावरील एक इमोशनल व्हिडिओ व्हायरल होत आहे. डान्स दिवाने मध्ये अनेक लहान तसेच मोठे डान्सर्स सामील आहेत. तर या मातृदिनानिमित्त स्पर्धकांचे विशेष डान्स परफॉर्मन्सेस पाहायला मिळाले. अनेकांनी आपापल्या आईला मांनवंदना दिली.

  मराठी अभिनेत्रीचं लय भारी काम! गरीबांना दान केला लग्नासाठी जमवलेला पैसा

  यावेळी शो मधील लहानगा सोहेल (Sohail) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोहेल हा तब्बल 3 महिने आईपासून दूर होता. तर त्याच्या आईची स्पेशल आणि सरप्राईज एन्ट्री दाखवण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांनंतर आपल्या आईला पाहून 6 वर्षांचा सोहेल भावूक होते. तर त्या मायलेकांच प्रेम पाहून अभिनेत्री नोरा फतेही ला ही अश्रू अनावर होतात.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  नोरा व्यतिरिक्त इतरही लोक भावूक होतात. सोहेल ला नोरा आणि तिचा सहकारी जज तुषार कालिया (Tushar Kalia) तु आईला किती दिस भेटला नाहीस असा प्रश्न करतात तेव्हा तो  3 महिने असं उत्तर देतो. तेव्हाच अचानक त्याच्या आईला बोलोवलं जातं. आणि अचानक आईला समोर पाहून सोहेल ला भावना अनावर होतात.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर लॉकडाउनमुळे सगळ्याप्रकारचं चित्रिकरण बंद आहे. त्यामुळे अनेक मालिका तसेच रियॅलिटी शो राज्याबाहेर शूट होत आहेत. ‘डान्स दिवाने 3’ देखिल राज्याबाहेर बँगलोर (Bangalore) शहरात शुट होत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Nora fatehi, Television show

  पुढील बातम्या