Home /News /entertainment /

मराठी अभिनेत्रीचं लय भारी काम! गरीबांना दान केला लग्नासाठी जमवलेला पैसा

मराठी अभिनेत्रीचं लय भारी काम! गरीबांना दान केला लग्नासाठी जमवलेला पैसा

साताऱ्यातील पाचगणीत कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला होता. पण यो विवाहसोहळ्यादरम्यान या नवदाम्पत्याने एका सामाजिक कार्यास हातभार लावला आहे.

  मुंबई 8 मे : ‘लव लग्न लोचा’ (Love Lagna Locha) फेम अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील पाचगणीत कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला होता. पण यो विवाहसोहळ्यादरम्यान या नवदाम्पत्याने एका सामाजिक कार्यास हातभार लावला आहे. रुचिता ने उद्योजक आनंद माने याच्याशी लग्नगाठ बांधली होती. सध्या लॉकडाउन असल्याने लग्नात केवळ 25 पाहूण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सगळ्या नियमांच कडेकोट पालन करून पाचगणीतील फर्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला होता. (Ruchita Jadhav donates in her wedding)
  ठरल्याप्रमाणे मेहेंदी, संगीत, हळद अशा कार्यक्रमांच नियोजनही झालं होतं. पण रुचिता आणि आनंद यांनी संगीत सोहळा रद्द करत पाचगणीच्या आजूबाजूला असलेल्या गावांत 1500 गहू तांदूळाचे पॅकेट्स वाटले आहेत.

  आई झाल्यानंतर या अभिनेत्रींनी सोडलं होतं करियर; आता कमबॅकसाठी करतात प्रयत्न

  रुचिता आणि आनंद यांनी दाखवलेली हि सामाजिक बांधिलकी पाहून सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं आहे.
  आनंद आणि रुचिताच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया वर फार व्हायरल होत आहेत. तर रुचिता ही लग्नाच्या पोषाखात अगदी मनमोहक दिसत आहे. रुचिता सोशल मीडिया वर फार सक्रिय असते. तर लग्नाच्याही सगळ्या अपडेट्स ती शेअर करत होती.
  3 ने रोजी रुचिता आणि आनंदने लग्न केलं होतं. त्यानंतर रुचिताच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. रुचिता ही ‘लव लग्न लोचा’ सह काही हिंदी मालिकांमध्येही दिसली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Television

  पुढील बातम्या