मुंबई 3 जून: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या चर्चेत आहे. नुकतीच अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांची लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ला 12 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. पण आता अंकितानं सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे.
अंकिता गेल्या वर्षभरापासून सुशांत सिंग राजपूत मृत्युमुळे चर्चेत होती. अंकिताने सुशांतला जाऊन वर्ष पूर्ण होत असतानाच सोशल मीडियावरून ब्रेक घेतला आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे. हे ‘गुडबाय नाही.. भेटू नंतर.’
View this post on Instagram
यानंतर अंकिताच्या या पोस्टवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एक युझरने लिहिलं बरोबर सुशांतच्या सोशल मीडिया पोस्टच्या एक वर्षांनंतर अंकिताने ब्रेक घेतला आहे. सुशांतने मागील वर्षी जूनला शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि त्यानंतर 14 जूनला त्याच्या मृत्यूची बातमी आली होती.
View this post on Instagram
अंकिता आणि सुशांतने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून मोठी लोकप्रियता मिळवली होती. मालिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही त्यांची जोडी हिट ठरली होती. अनेक वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत होते. 2016 मध्ये ते विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते कायमचे विभक्त झाले. त्यांची केमिस्ट्री रिल आणि रियल दोन्ही दोन्ही प्रेक्षकांना फारच भावली होती.
HBD Rinku : सैराटची आर्ची अशी पोहोचली बॉलिवूडमध्ये; मेकओव्हर फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित
मालिकेनं नुकतीच 12 वर्षे पूर्ण केलीत. यानिमित्ताने अंकिताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत ती सोशल मीडियावर लाईव्ह आली होती. यावेळी तिने सुशांत विषयी बोलताना म्हटलं की, अर्चनाचा मानव हा केवळ सुशांतच आहे. या सेशन दरम्यान तिने अनेक गप्पा गोष्टी केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.