मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) ही आता हिंदी चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावत आहे. सैराटनंतर रिंकूला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. पण आता रिंकूमध्ये फार मोठा बदल झाला असून ती अतिशय ग्लॅमरस झाली आहे.
यासोबतच रिंकूने तिच्या लुकवरही मोठ काम केलं आहे. पूर्वीपेक्षा तिच्यात अनेक बदल झाले आहेत तसेच ती स्वतःला अधिकाधिक फिट करण्याचा प्रयत्न करत आहे.
रिंकूने सैराट नंतर 'कागर', 'मेकअप' या चित्रपटांत काम केलं मात्र ते बॉक्सऑफिसवर फार यशस्वी होताना दिसले नाहीत.
त्यानंतर रिंकूने तिचे गुरू नागराज मंजूळे यांचाच 'झुंड' (Zhund) हा बॉलिवूड चित्रपट साईन केला मात्र अद्याप तो प्रदर्शित झाला नाही. त्यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे.
मागील वर्षी ती 'हंड्रेड' (Hundred) या वेबमालिकेत दिसली होती. त्यात तिने लारा दत्ता सोबत काम केलं होतं. यातील तिच्या कामाचं कौतुकही झालं होतं.
रिंकू झुंड चित्रपटातूनच ब़ॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र तो चित्रपट प्रदर्शित न झाल्याने तिने वेबसीरिजमधूनच पदार्पण केलं आहे.
रिंकूचा नवा मेकओव्हर लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. सोशल मीडियावर तिचे नवनवीन लुक शेअर करत असते.