जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / निर्मात्यांनी केली मोठी घोषणा; रणबीर नव्हे या अभिनेत्यासोबत आलिया करणार रोमान्स

निर्मात्यांनी केली मोठी घोषणा; रणबीर नव्हे या अभिनेत्यासोबत आलिया करणार रोमान्स

आलिया भट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेस रोलरला महत्त्व देते.

आलिया भट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेस रोलरला महत्त्व देते.

आलिया भट्टच्या पुढ्यात सध्या अनेक चित्रपटआहेत तर आणखी एका चित्रपटाची आता भर पडली आहे. यात प्रसिद्ध टिव्ही अभिनेता झळकणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल : आभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ‘गंगूबाई काठीयावाडी’ (Gangubai Kathiawadi), ‘आरआरआर’ (RRR), ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra)  या आगामी चित्रपटांत ती दिसणार आहे. तर तिच्या पुढ्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. व या मध्ये एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता ही दिसणार आहे. नुकतीच  या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील हॅन्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता पार्थ समथान (Parth Samthaan) हा अभिनेत्री आलिया भट्ट सोबत झळकणार आहे. अल्पावधीतच पार्थने छोट्या पडद्यावर चाहत्यांची मनं जिंकली होती. 2014 साली एम टीव्ही (MTV) वरील ‘कैसी है ये यारियां’ (Kaisi hai yeh yaarian) या मालिकेतून तो तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला होता.

‘या’ आहेत बॉलिवूडच्या खऱ्या राजकुमारी; राजघराण्यात झाला होता जन्म

त्यानंतर एका चित्रपटासाठी त्याने टेलिव्हिझन वरून ब्रेक घेतला होता पण तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर 2018 साली एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदकी की’ (kasauti zindagi ke) या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. तर या ही मालिकेतून त्याने तुफान लोकप्रियता मिळवली होती. व आता तो मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Popular Actor Parth Samthaan of KasautiiZindagiiKay and KaisiYehYaariyaan is all set to make his Hindi Film Debut. The… Posted by Parth Samthaan on  Saturday, 17 April 2021

जाहिरात

टाइम्स ऑफ इंडीया (TOI) ने दिलेल्या वृत्तानुसार वर्षाअखेरीस चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल. आउटसाइडर असल्याने ही त्याच्यासाठी एक मोठी संधी असेल जी त्याला गमवायची नाही. असही पार्थने सांगितलं.

पार्थ आलियासोबत संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसणार अशी चर्चा होती. मात्र त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पार्थ ‘पिहरवा’ (Piharva) या चित्रपटात आलिया सोबत दिसणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात